फाळणीआधी कसा होता भारत? नव्या दिग्दर्शकासह Karan Johar मोठ्या पडद्यावर मांडणार इतिहास

फाळणीआधी कसा होता भारत? नव्या दिग्दर्शकासह Karan Johar मोठ्या पडद्यावर मांडणार इतिहास

करण जोहर स्वत: या चित्रपटाची कास्टिंग ठरवणार आहे. तर अभिनेते बोमन इरानी (Boman Irani) यांचा मुलगा केयोज इरानी (Kayoze Irani) हा चित्रपट दिग्दर्शिक करणार आहे.

  • Share this:

मुंबई 4 मे : दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचं (Karan Johar) प्रोडक्शन हाऊस लवकरच काही नव्या चित्रपटांची घोषणा करणार आहे. मागील वर्षभरापासून अनेक चित्रपटांचं चित्रिकरण तसंच काहींच प्रदर्शनही रखडलं आहे. तर काही चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाईलाजाने प्रदर्शित होत आहेत. धर्मा प्रोडक्शनचेही (Dharma Production)  काही चित्रपट बाकी आहेत. आता भारताच्या फाळणीपूर्व चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

अभिनेते बोमन इरानी (Boman Irani) यांचा मुलगा केयोज इरानीने (Kayoze Irani)  करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून अभिनय श्रेत्रात पदार्पण केलं होत. अभिनयाशिवाय तो एक दिग्दर्शक देखrल आहे. नेटफ्लिक्सवरील 'अनेक' हा चित्रपट त्याने दिग्दर्शित केला होता. प्रेक्षकांनी त्याला भरघोस प्रतिसादही दिला होता. आता केयोज धर्मा प्रोडक्शनचा हा नवा चित्रपट देखील दिग्दर्शित करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Kayoze Irani (@kayozeirani)

फाळणीपूर्व काळातील हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट असणार आहे. याशिवाय इमोशनल थ्रिलर जॉनरचा (emotional thriller) चित्रपट असून करण जोहर स्वत: या चित्रपटाची कास्टिंग ठरवणार आहे. लवकरच तो मुख्य अभिनेत्री आणि अभिनेत्यांची घोषणा करणार आहे.

वाचा - कंगना सोनू सूदवर जळते? कंगनाच्या 'त्या' कृत्याने सोशल मीडियावर चर्चांना आलं उधाण

करण जोहर धर्मा प्रोडक्शनसाठी आणखी नवे आणि तरूण 14 दिग्दर्शक नेमत आहे. आता जास्तीत जास्त वेब कन्टेटवरही भर देत आहे. आणि त्यासाठीच नवे फिल्ममेकर नेमण्यात येत आहेत. केयोज यातीलच एक आहे.

चित्रपटाचं बरचसं काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे चित्रपटाची घोषणा नक्की कधी होणार हे गुदस्त्यात आहे. धर्मा प्रोडक्शनचे काही चित्रपट हे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, पण ल़ॉकडाउनमुळे प्रदर्शन रखडलं आहे. त्यातीलच ‘सुर्यवंशी’ (Suryavanshi) हा मागील वर्षभरापासून रखडला आहे. तर याच प्रोडक्शनचे ‘ब्रम्हास्त्र’, ‘दोस्ताना 2’, ‘जुग जुग जियो’, ‘शेरशाह’, ‘मिस्टर लेले’ हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Published by: News Digital
First published: May 4, 2021, 5:24 PM IST

ताज्या बातम्या