मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कंगना सोनू सूदवर जळते? कंगनाच्या 'त्या' कृत्याने सोशल मीडियावर चर्चांना आलं उधाण

कंगना सोनू सूदवर जळते? कंगनाच्या 'त्या' कृत्याने सोशल मीडियावर चर्चांना आलं उधाण

कंगनाचं ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्याची बातमी असली, तरी तिने काही काळापूर्वी सोनू सूद (Sonu Sood) विषयीचं एक ट्वीट लाइक केलं होतं. सर्वांना मदत करणाऱ्या सोनूविरुद्धही कंगना पवित्रा घेतेय अशी नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 4 मे : नेहमीच चर्चेत राहणारी तसेच सोशल मीडियावर ट्रोलर्सचा निशाणा बनणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आता पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. एक तर तिचं  ट्विटर अकाउंट सस्पेंड (kangana twitter account) झाल्याने ती सध्या चर्चेत आहे. पण तिने यापूर्वी एक ट्वीट लाइक केलं होतं ते सोनूविषयीचं होतं. त्याविषयीही आता चर्चा सुरू आहे.

मागील वर्षभरापासून लोकांची मनोभावे सेवा करणारा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि पंगा क्वीन कंगनाचा हा विषय नेटकऱ्यांनीही लावून धरला आहे. सोनू सूद वर एका युझरने काही आरोप केले आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला.

दरम्यान सोशल मीडियावर एका युझरने सोनू सूद करत असलेल्या मदतीला फ्रॉड म्हटलं होतं. त्याने ट्विट करत लिहिलं होत, ‘तू या लोकांचा विश्वासघात करत आहेस ज्यांचे जवळचे मरत आहेत. 10 लीटर ऑक्सिजन कॉन्स्न्ट्रेटरची किंमत 1 लाख नसते आणि तू 5 लीटरसाठी 2 लाख घेत आहेस. असा फ्रॉड करून तुला रात्री झोप कशी येते.’

काही वेळातच हे ट्वीट  व्हयरल होऊ लागलं. अनेकांनी ते रिट्विट केलं तर काहींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने ही हे ट्वीट लाइक केलं आहे. त्यामुळे कंगना सोनूवर आणि त्याच्या प्रसिद्धीवर जळते अशा आशयाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘तो कोणी छोटा राजन नव्हता…'; बेड न मिळाल्याने नातेवाईकाचा मृत्यू, इरफान खानच्या पत्नीचा राग अनावर

ज्या युझरने हे ट्विट केलं होतं त्याला कंगना फॉलो देखिल करते.  ट्विट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांचं म्हणणं आहे की सोनूला माहित देखिल नसेल कि त्याच्या नावाने असा काळा बाजार सुरू आहे. अनेकांनी असा काळा बाजार करणाऱ्या व सोनूचं नाव वापरणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला.

दरम्यान सोनूने अनेकदा स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहेकी तो त्याने केलेल्या मदतीसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही. तर ते पूर्णपणे मोफत असते. तेव्हा अशा खोट्या आणि काळबाजार करणाऱ्या लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Bollywood, Kangana ranaut, Sonu Sood