मुंबई 20 जून: बॉलिवूडचा सर्वात चर्चेत राहणारा दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (Karan Johar) इंडस्ट्रीतील अनेकांशी घरोब्याचे संबध ठेवतो. अनेक जन त्याचे जवळचे मित्र आहेत. तर अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) व संपूर्ण भट्ट कुटुंबाशी त्याचे चांगले संबध आहेत. आलियाला तो आपली मुलगी मानतो. तर त्यानेच आलियाला बॉलिवूडमध्येही ब्रेक दिला होता.
करण- आलियाचं बाँडींग काही नवं नाही. करण जोहरच्या निरिक्षणाखाली आलिया आजही काम करते. तर तो तिला मार्गदर्शन करतो. अलिया त्याला आपल्या गॉडफादर मानते. अनेकदा तिने अनेक सोहळ्यांमध्ये याचा उल्लेखही केला आहे. तर आता करणने पितृदिनाच्या निमित्ताने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
Father’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका
या पोस्टमध्ये करणने लिहिलं आहे, ‘माझी लहान मुलगी आलिया भट्ट. माझ्या पितृत्वाची पहिली सुरुवात. खूप प्रेम. असं करणने लिहिलं आहे. यात त्याने आलियाला टॅगही केलं आहे.’
दरम्यान करणला स्वतःची दोन लहान मुलं आहेत. त्यांचा जन्म 2017 मध्ये झाला होता. करणने कधीही विवाह केला नव्हता. पण त्याने सरोगेसीच्या (Surrogacy) माध्यमातून दोन मुलांना जन्म दिला आहे. तर सिंगल पिता बनून तो त्यांचा सांभाळ करत आहे. (Karan Johar single father)
View this post on Instagram
यश आणि रूही अशी त्याच्या मुलांची नावं असून ते दोघेही जुळे मुलं आहेत. तर आता ते 4 वर्षांचे झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकदा तो त्यांचे फोटो शेअर करत असतो. तर अनेकदा आलिया देखील त्यांच्यासोबत खेळताना दिसते.
2012 साली आलियाने करणच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आलियाचा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतरही आलियाने करणच्या अनेक चित्रपटांत काम केलं होतं. सध्या आलिया बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Entertainment, Karan Johar