VIDEO : करण जोहरचा असा अपमान आतापर्यंत कोणीच केला नसेल, जेव्हा खास व्यक्तीच म्हणते...

VIDEO : करण जोहरचा असा अपमान आतापर्यंत कोणीच केला नसेल, जेव्हा खास व्यक्तीच म्हणते...

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर सर्वांनाच वाटेल की करण जोहरचा असा अपमान पूर्वी कधीच झाला नसेल.

  • Share this:

मुंबई, 9 मे : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं या इंडस्ट्रीमध्ये नेहमीच स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक नव्या कलाकारांचा तो गॉडफादर मानला जातो. करणानं आतापर्यंत त्याच्या सिनेमातून अनेक नव्या कलाकारांना लॉन्च केलं आहे. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर सर्वांनाच वाटेल की करण जोहरचा असा अपमान पूर्वी कधीच झाला नसेल.

करण सध्या त्याची मुलं यश आणि रुही यांच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. दरम्यान तो सोशल मीडियावर सुद्धा बराच सक्रिय आहे. तो नेहमीच त्याच्या मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशात नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये या दोघांनीही बाबा करणची पोलखोल केली आहे. एवढंच नाही तर या दोघांनी करणचा अपमान सुद्धा केला आहे.

‘आजचा दिवस खास आहे..’ इरफान खानच्या आठवणीत दीपिका झाली भावूक, शेअर केली ही कविता

करणननं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओे शेअर केला आहे. ज्यात त्याची मुलगी रुही कारवा सुरू करण्याचा प्रयत्न करत असलेली दिसते. कदाचित तिला गाणं ऐकायचं असावं. त्याच वेळी करण तिथे येतो आणि रुहीसाठी गाणं गायला सुरुवात करतो. करण त्याच्या मुलांसमोर 'चौदवी का चांद हो या आफताब हो' हे गाणं गायला सुरुवात करतो. पण त्याचवेळी दोघंही त्यानं गाणं बंद करायला हवं असा सल्ला देतात कारण त्याच्या आवाज त्यांना डोकेदुखी वाटतो. मुलांचं हे बोलणं ऐकून करण नाराज होतो आणि त्यांची माफी मागून निघून जातो.

 

View this post on Instagram

 

No appreciation for my singing #lockdownwiththejohars

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

विशेष म्हणजे करणला बॉलिवूड इंडस्ट्रीमधला सर्वात चांगला अँकर मानलं जातं. त्याच्या आवाजाचे लोक दिवाने आहेत. मात्र करणच्या मुलांनी त्याच्या आवाजाबद्दल असं बोलणं हा त्याच्या अपमानच आहे. पण अर्थात लहान मुलांचं बोलणं मनावर घ्यायचं नसतं तसं करणनं सुद्धा घेतलेलं नाही आणि त्यानं स्वतःच हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसं पाहायला गेलं तर करणचं त्याच्या दोन्ही मुलांसोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे जे त्याच्या फोटो आणि व्हिडीओमधून दिसत असतं.

आठशे खिडक्या नऊशे दारं! लॉकडाऊनमध्ये शूट केली नवी मालिका, पाहा VIDEO

OMG! स्वतःपेक्षा 32 वर्षांनी मोठ्या असलेल्या सलमानवर या अभिनेत्रीचा जडलाय जीव

First published: May 9, 2020, 10:24 AM IST

ताज्या बातम्या