मुंबई, 8 मे : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचं 29 एप्रिल रोजी निधन झालं. त्यांनी अचानक घेतलेल्या या एग्जिटमुळे संपूर्ण सिनेक्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर इतके दिवस लोटले तरी चाहत्यांमध्ये त्यांची आठवण कायम आहे व कायम राहिल.
यादरम्यान चाहत्यांपासून ते अख्ख्या सिनेसृष्टीने त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आणि त्यांच्या आत्मास शांती लाभावी अशी कामना केली. त्यात आज 8 मे रोजी अभिनेत्री दीपिका पादुकाने (Deepika Padukone) यांनी इरफान खान यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आज दीपिका पादुकोन आणि इरफान खान यांचा अत्यंत गाजलेल्या ‘पिकू’ या सिनेमाला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. दीपिकाने पिकू चित्रपटाला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रसंगी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पिकूच्या सेटवरील हसत असतानाचा इरफान खान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने एक कविता शेअर केली आहे.
दीपिकाने शेअर केलेली कविता-
लम्हे गुज़र गये
चेहरे बदल गये
हम थे अंजानी राहो में पल में रुला दिया
पल में हसा के फिर
रह गये हम जी राहो में थोड़ा सा पानी है रंग है
थोड़ी सी छावो है.
चुभती है आंखो में धूप
ये खुली दिशाओ में और दर्द भी मीठा लगे
सब फ़ासले ये कम हुए
ख्वाबो से रस्ते सजाने तो दो
यादो को दिल में बसाने तो दो
लम्हे गुज़र गये
चेहरे बदल गये
हम थे अंजानी राहो में थोड़ी सी बेरूख़ी जाने दो
थोड़ी सी ज़िंदगी
लाखो स्वालो में ढूंधू क्या
थक गयी ये ज़मीन है
जो मिल गया ये आस्मा
तो आस्मा से मांगू क्या
ख्वाबो से रस्ते सजाने तो दो
यादों को दिल में बसाने तो दो –Piku
8 मे 2015 मध्ये आलेल्या पिकू या चित्रपटात इरफान खानयांच्यासह दीपिका पादुकोन यांनी काम केलं आहे. सुजीत सरकारद्वारा दिग्दर्शित या चित्रपट खूप गाजला होता. यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दीपिका पादुकोन यांच्या वडिलांची भूमिका केली होती.
संबंधित -मध्यरात्री उठून 500 मुस्लीम कैद्यांसाठी न्याहरी तयार करतात हिंदू बांधव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.