जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Dharmendra: लाडक्या नातवाच्या लग्नाच्या विधींमध्ये सहभागी होणार नाहीत धर्मेंद्र; काय आहे कारण?

Dharmendra: लाडक्या नातवाच्या लग्नाच्या विधींमध्ये सहभागी होणार नाहीत धर्मेंद्र; काय आहे कारण?

धर्मेंद्र - करण देओल

धर्मेंद्र - करण देओल

धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. पण धर्मेंद्र आपल्या नातवाच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जून:  बी-टाऊनमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. आता या यादीत लवकरच धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलच्या लेकाचं नाव सामील होणार आहे.  धर्मेंद्रचा नातू करण लवकरच वर म्हणून बोहल्यावर चढणार आहे. त्याच्या लग्नासाठी धर्मेंद्र यांचा जुहू येथील आलिशान बंगला गजबजला आहे. धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. पण धर्मेंद्र आपल्या नातवाच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. सध्या संपूर्ण देओल कुटुंब लग्नाच्या जल्लोषात मग्न आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल 18 जूनला लग्न करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची तयारी सुरू होती. करण देओलचा रोका सोहळा सोमवार, 12 जून रोजी पार पडला. जुहू येथील धर्मेंद्र यांच्या बंगल्यावर हा सोहळा पार पडला, मात्र त्यात धर्मेंद्र कुठेच दिसले नाहीत. धर्मेंद्र नातू करण देओलच्या लग्नामुळे खूप खूश आहेत, पण ते फक्त लग्नाला उपस्थित राहणार आहे आणि इतर सगळ्या कार्यक्रमापासून दूर राहणार आहेत. यामागे काय कारण आहे?

News18लोकमत
News18लोकमत

मीडिया रिपोर्टनुसार, करण देओलच्या लग्नातील इतर विधींपासून दूर राहण्याबाबत धर्मेंद्र म्हणाले, ‘मुलांना आनंद घेऊ द्या. मी तिथे असलो तर मुलांवर काही बंधनं येतील. हा क्षण त्यांनी गमावू नये असे मला वाटते. धर्मेंद्र म्हणाले की, आता ते फक्त 18 जूनला होणाऱ्या लग्नाला उपस्थित राहणार आहे.’ सनी देओल अन् बिग बींमध्ये आहे 36 चा आकडा! या कारणामुळं बच्चन कुटुंबावर नाराज आहे धर्मेंद्रचा लेक 87 वर्षीय धर्मेंद्र बहुतेक वेळ फार्महाऊसवर घालवतात. ते चित्रपटांमध्ये काम करत आहे आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक्वा व्यायामही करतात . वाढत्या वयामुळे आणि काही समस्यांमुळे धर्मेंद्र यांनी नातवाच्या लग्नातील इतर विधींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा. धर्मेंद्र हा नातू करणच्या खूप जवळचा आहे. करण देओल जेव्हा चित्रपटांमध्ये पदार्पण करत होता, तेव्हा धर्मेंद्र यांनीच त्याला त्याच्या ‘ब्लॅकमेल’ चित्रपटातील ‘पल पल दिल के पास’ या गाण्यावरून चित्रपटाचे नाव देण्याचा सल्ला दिला होता. त्याचवेळी सनी देओल मुलगा करणच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. बऱ्याच दिवसांनी देओल कुटुंबीयात लग्नाचा सोहळा पार पडणार असून, सनीला तो क्षण खास बनवायचा आहे. करण देओल प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्य हिच्याशी लग्न करत आहे. या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये जॅकी श्रॉफपासून अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर, पूनम धिल्लन आणि अमृता सिंग यांच्यासह संपूर्ण कुटुंबाच्या नावांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात