मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कपूर फॅमिलीचं जंगी ख्रिसमस सेलिब्रेशन! फोटोमधून आलिया-रणबीर गायब

कपूर फॅमिलीचं जंगी ख्रिसमस सेलिब्रेशन! फोटोमधून आलिया-रणबीर गायब

कोणताही सण असो किंवा पार्टी हे कपूर कुटुंब कायम सोबत सेलिब्रेशन करताना दिसून येतं. आपल्या कामातून वेळ काढून हे लोक प्रत्येक सणाला एकत्र येतात.

कोणताही सण असो किंवा पार्टी हे कपूर कुटुंब कायम सोबत सेलिब्रेशन करताना दिसून येतं. आपल्या कामातून वेळ काढून हे लोक प्रत्येक सणाला एकत्र येतात.

कोणताही सण असो किंवा पार्टी हे कपूर कुटुंब कायम सोबत सेलिब्रेशन करताना दिसून येतं. आपल्या कामातून वेळ काढून हे लोक प्रत्येक सणाला एकत्र येतात.

  मुंबई, 26 डिसेंबर-  बॉलिवूडमधील   (Bollywood)  कपूर कुटुंब   (Kapoor Family)  सर्वांनाच माहिती आहे. या कुटुंबाने मनोरंजनसृष्टीला अनेक अष्टपैलू कलाकार दिले आहेत.तसेच हे कुटुंब 'जॉईंट फॅमिली'चं एक उत्तम उदाहरण आहे. कोणताही सण असो किंवा पार्टी हे कुटुंब कायम सोबत सेलिब्रेशन करताना दिसून येतं. आपल्या कामातून वेळ काढून हे लोक प्रत्येक सणाला एकत्र येतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कपूर कुटुंबाने सोबत ख्रिसमसचं सेलिब्रेशन  (Christmas Celebration)  केलं आहे. त्यांचा एक सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु या फोटोमधून रणबीर कपूर   (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) गायब आहेत. अरमान जैननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसून येत आहे.हे सर्वजण ख्रिसमस लंचसाठी एकत्र जमले होते. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि जेनिफर केंडल यांचा मोठा मुलगा कुणाल कपूरने या ख्रिसमस लंचक आयोजन केलं होतं. यासाठी सर्व कपूर कुटुंब अगदी उत्साहात एकत्र दिसून येत होतं.प्रत्येक वर्षी कपूर कुटुंबात अशा ख्रिसमस लंचच आयोजन केलं जातं. यानिमित्ताने हे कुटुंब आपल्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून एकमेकांसोबत आनंद साजरा करत असतात. प्रेक्षकांनाही त्यांना एकत्र पाहायला फार आवडतं.
  फोटोमध्ये कोणाकोणाची उपस्थिती- रणधीर कपूर यांच्या बहिणीचा मुलगा अर्थातच करिना कपूरचा आत्तेभाऊ अरमान जैनने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये रीना, शम्मी कपूर यांची पत्नी नीला देवी,कुणाल कपूर, करिश्मा कपूर, करिना कपूर, सैफ अली खान, तैमूर, करिश्मा कपूरच्या मुली, अरमान जैन, त्याची गर्लफ्रेंड तारा सुतारीया असे सर्वजण उपस्थित होते. मात्र या पार्टीमध्ये नीतू सिंह, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे चाहते कमेंट करून त्यांची चौकशी करत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हे वाचा:स्मृति ईरानींच्या लेकीचा पार पडला साखरपुडा; 'तुलसी' ने असं केलं जावयाचं स्वागत) काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूरला कोरोनाची लग्न झाली होती. त्यामुळे ती होम आयसोलेशनमध्ये होती. याकाळात ती आपल्या पती आणि मुलांपासून दूर होती. ती सतत सोशल मीडियावरून त्यांची आठवण काढत होती. अभिनेत्रीला आपला लाडका मुलगा तैमूरचा वाढदिवससुद्धा साजरा करता आला नव्हता. यामधून बाहेर पडल्यानंतर ती पहिल्यांदाच मीडियासमोर आली. नुकताच सैफ आणि तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये तैमूर आणि जेहसुद्धा होते. व्हिडीओमध्ये तैमूर पोज देताना दिसून येत होता. तर जेह फारच क्युट एक्स्प्रेशन देताना दिसून आला होता. हा व्हिडीओ फारच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ कुणाल कपूरच्या घराबाहेरचा होता. करिना आणि सैफ ख्रिसमस लंचमध्ये सहभागी होण्यासाठी येथे आले होते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Alia Bhatt, Entertainment, Kareena Kapoor, Ranbir kapoor

  पुढील बातम्या