मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्मृति ईरानींच्या लेकीचा पार पडला साखरपुडा; 'तुलसी' ने मजेशीररित्या केलं जावयाचं स्वागत

स्मृति ईरानींच्या लेकीचा पार पडला साखरपुडा; 'तुलसी' ने मजेशीररित्या केलं जावयाचं स्वागत

 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री  (Tv Actress)   ते अमेठीच्या   (Amethi)  खासदार आणि महिला व बालविकास मंत्री असा प्रवास करणाऱ्या स्मृति ईरानी   (Smriti Irani)  नेहमीच चर्चेत असतात.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) ते अमेठीच्या (Amethi) खासदार आणि महिला व बालविकास मंत्री असा प्रवास करणाऱ्या स्मृति ईरानी (Smriti Irani) नेहमीच चर्चेत असतात.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) ते अमेठीच्या (Amethi) खासदार आणि महिला व बालविकास मंत्री असा प्रवास करणाऱ्या स्मृति ईरानी (Smriti Irani) नेहमीच चर्चेत असतात.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई,26 डिसेंबर-  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री  (Tv Actress)   ते अमेठीच्या   (Amethi)  खासदार आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री असा प्रवास करणाऱ्या स्मृति ईरानी   (Smriti Irani)  नेहमीच चर्चेत असतात.एकता कपूरच्या   (Ekta Kapoor)  'क्योंकी सास भी कभी बहू थी'   (Kyonki Saans Bhi Kabhi Bahu Thi)  मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं. त्यांना मालिकांमध्ये सर्वांनीच सासूच्या भूमिकेत पाहिलं असेल. परंतु आता त्या रिअल लाईफमध्ये सासू बनल्या आहेत. त्यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. अभिनेत्री आणि खासदार स्मृति ईरानी यांनी नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्यांच्या मुलीच्या संदर्भातील आहे.स्मृति यांनी शेअर केलेला फोटो सुंदर कपल फोटो आहे. हा फोटो त्यांची मुलगी शनैल ईरानीचा आहे. यामध्ये त्यांची मुलगी शनैलने आपल्या बॉयफ्रेंड अर्जुन भल्लासोबत साखरपुडा केल्याचं दिसत आहे. शनैल ही स्मृति ईरानी यांची सावत्र मुलगी आहे. त्यांनी आपल्या या लेकीचा फोटो शेअर करत खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघेही एका सुंदर अशा टेरेसवर उभारलेले दिसत आहेत. ते एकमेकांना अंगठी घालताना आहेत.
स्मृति ईरानी यांनी हा फोटो शेअर करत आपल्या हटके अंदाजात जावयाला शुभेच्छा आणि गोड धमकीही दिली आहे. त्यांनी फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'अर्जुन भल्लासाठी खास ज्याच्यापाशी आता आमचं मन आहे.आमच्या वेड्या कुटुंबात तुझं स्वागत आहे. सासऱ्याच्या रूपात एका वेड्या माणसाचा सामना करण्यासाठी आणि एका कठोर सासूला सामोरं जाण्यासाठी तुला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा'. असं म्हणत स्मृति ईरानी यांनी आपल्या जावयाचं मजेशीररित्या स्वागत केलं आहे. सध्या त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. (हे वाचा:Taarak Mehta...फेम भिडे मास्टरच्या सोनूने सांगितलं आपल्या बॉयफ्रेंडचं नाव) स्मृति ईरानी यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी छोटा पडदा गाजवला होता. आजही अनेक लोक त्यांना एक अभिनेत्री म्हणूनच ओळखतात. एकता कपूरच्या अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. या मालिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. त्यातीलच एक मालिका म्हणजे 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही होय. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. एकता कपूरच्या या मालिकेतून स्मृति ईरानी या 'तुलसी' च्या रूपात घराघरात पोहोचल्या होत्या. त्यांना आजही तुलसी या नावाने ओळखलं जातं. मात्र काही काळाने त्यांनी मनोरंजन सृष्टीला रामराम ठोकत राजकारणात प्रवेश केला होता. आज त्या एक राजकारणी असल्या तरी मनोरंजनसृष्टीतील लोकांची त्यांची तितकीच घट्ट मैत्री आहे. त्यांनी आपल्या मुलीची पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या पोस्टवर एकता कपूर, मौनी रॉयसोबत अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
First published:

Tags: Entertainment, Smriti irani

पुढील बातम्या