मुंबई, 24 ऑगस्ट- कपिल शर्मा हा मनोरंजनसृष्टीतील एक बहुगुणी व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जातो. तो एक प्रसिद्ध कॉमेडियन,अभिनेता, होस्ट आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरसुद्धा कपिल सतत चर्चेत असतो. हा कॉमेडियन आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहे. कधी,कुठे कसं बोलावं आणि समोरच्यांची बोलती बंद करावी हे त्याला चांगलंच ठाऊक असतं. त्याच्या शोमध्ये भलेभले बॉलिवूड अभिनेते पेचात पडतात. दरम्यान सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये आता कपिल शर्माची एन्ट्री झाली आहे. यावर कॉमेडियनने आपलं मत दिलं आहे. पिंकव्हीलाच्या रिपोर्टनुसार, नुकतंच कपिल शर्माला पापाराझींनी घेरलं होतं. यावेळी त्याला अनेक विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. त्याचबरोबर सध्या चर्चेत असणारा विषय म्हणजे ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या विषयावरही त्याला बोलतं केलं. कपिल शर्माला पापाराझींनी विचारलं, ‘सध्या प्रचंड चर्चेत असणारा विषय म्हणजे ‘बॉयकॉट बॉलिवूड’ यावर तुमचं काय मत आहे?’ नुकतंच आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा, अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि अनुराग कश्यपचा दोबारा या चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागला यावर तुम्ही काय सांगाल?’ कपिल शर्मानं नेहमीप्रमाणे आपल्या हुशारीने उत्तर देत म्हटलं, ‘हे ट्रेंड-व्रेन्ड चालतच राहणार, या सगळ्या वेळेच्या गोष्टी आहेत’. यावर पापाराझींनी म्हटलं, नुकतंच तुमचा मित्र अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटालासुद्धा बॉयकॉटचा सामना करावा लागला. यावर उत्तर देत कपिल शर्माने म्हटलं, ‘त्यांच्या चित्रपटाला बॉयकॉट करा असा कोणताच ट्रेंड माझ्या तरी बघण्यात आलेला नाहीय. या ट्विटरच्या जगापासून दूर राहण्याचा सल्लाही कपिलने यावेळी दिला. कॉमेडियनने म्हटलं मला या जगातून बाहेर यायला खूप वेळ लागला, त्यामुळे दूर राहा’. **(हे वाचा:** Haddi : हड्डी’ सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट; प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण ) कपिल शर्मा सध्या आपल्या ‘द कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोसह छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सध्या या शोचं शूटिंगसुद्धा सुरु झालं आहे. हा शो छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोमध्ये आता कृष्णा अभिषेक दिसणार नाहीय. त्याने शोमध्ये सपनाची भूमिका साकारली होती. परंतु आता त्याने पाय घेतला आहे. कपिलबाबत सांगायचं तर तो नुकतंच एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. इतकंच नव्हे तर कॉमेडियनने चक्क रॅम्प वॉकसुद्धा केला. परंतु यामध्येसुद्धा ट्विस्ट आणत त्याने उपस्थितांना पोट धरुन हसायला भाग पाडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.