मुंबई, 20 जून: कोणत्याही अभिनेत्रीसाठी तिचा चेहरा फार महत्त्वाचा असतो. तिचं संपूर्ण करिअर तिच्या चेहऱ्यावर अवलंबून असतं. मात्र काही अभिनेत्री या सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याच्या काही सर्जरी करतात. मात्र ती सर्जरी फसल्यानं अनेकांचा चेहरा विद्रुप होतो. बऱ्याच कलाकारांचा मृत्यूही झाल्याचं आपण पाहिलं आहे. अशीच अवस्था कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश (Kannada Actress Swathi Sathish ) हिची झाली आहे. मात्र तिनं चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी नाही तर दातांची ट्रिटमेंट घेतली होती. दातांचं रुट कॅलन करताना डॉक्टरांच्या चुकीमुळे तिचा चेहरा खराब झाला असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे. सध्या अभिनेत्रीचे सर्जरीचे बिफोर आफ्टर फोटो व्हायरल होत आहेत. कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिच्या रुट कॅनॉल सर्जरीनंतरचे फोटो समोर आले आहेत. ज्यात तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला आहे. संपूर्ण चेहऱ्याला सूज आलीये. तिला पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. स्वातीनं काही दिवसांपूर्वी बंगळूर येथे रुट कॅनॉल थेरपी केली. त्यानंतर तिच्या चेहऱ्याला सूज आली आणि दुखू लागलं. हे दुखणं 2-3 दिवसात थांबेल असं आश्वासन तिच्या डॉक्टरांनी दिलं पणं असं काहीच न होता स्वातीचा चेहरा आणखी खराब होत गेला. 3 आठड्यानंतरही स्वातीच्या चेहऱ्याची सूज कमी झाली नाही. तिच्या चेहऱ्याची झालेली अवस्था पाहावेनाशी झाली आहे. तिला घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे. आपल्याबाबत काहीतरी चुकीचं झालं असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिनं तात्काळ दुसऱ्या डॉक्टरांकडे धाव घेतली. हेही वाचा -
आई समोर अमृता फेल! चंद्रमुखीच्या सक्सेस पार्टीत माय लेकींचा जबरदस्त डान्स तूफान व्हायरल
या सगळ्या प्रकारानंतर स्वातीने तिच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप लावले आहेत. स्वातीनं म्हटलंय, ‘डॉक्टरांनी रुट कॅनॉल करताना मला चुकीची आणि अर्थवट माहिती दिली. ट्रीटमेंट दरम्यान अॅनेस्थेशिया ऐवजी सेलिसिलिका अँसिड देण्यात आलं’. स्वातीनं दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन तिची अवस्था दाखवल्यानंतर हा प्रकार तिच्या समोर आला. याआधीही अशाप्रकारे अनेक कलाकारांना चुकीच्या सर्जरी करुन फसवण्यात आलं आहे. मागील आठवड्यातच अभिनेत्री चेतना राज हिचा प्लास्टिक सर्जरीदरम्यान मृत्यू झाला. सर्जरीनंतर चेतना राजची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे प्लास्टिक सर्जरी किंवा कोणत्याही अवयवाची सर्जरी करताना कलाकारांप्रमाणे सर्वसामान्यांनीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.