जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आई समोर अमृता फेल! चंद्रमुखीच्या सक्सेस पार्टीत माय लेकींचा जबरदस्त डान्स तूफान व्हायरल

आई समोर अमृता फेल! चंद्रमुखीच्या सक्सेस पार्टीत माय लेकींचा जबरदस्त डान्स तूफान व्हायरल

आई समोर अमृता फेल! चंद्रमुखीच्या सक्सेस पार्टीत माय लेकींचा जबरदस्त डान्स तूफान व्हायरल

आई समोर अमृता फेल! चंद्रमुखीच्या सक्सेस पार्टीत माय लेकींचा जबरदस्त डान्स तूफान व्हायरल

चंद्रमुखी सिनेमाच्या ग्रँड सक्सेस पार्टी नुकतीच पार पडली. या पार्टीत अमृता खानविलकर आणि तिची आई दणकून नाचताना दिसल्या. दोघींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून: संपूर्ण महाराष्ट्रात ज्या सिनेमानं धुमाकूळ घातला तो सिनेमा म्हणजे चंद्रमुखी ( Chandramukhi) तब्बल 7 आठवडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशाबाहेरही सिनेमाचं कौतुक करण्यात आलं आहे. मराठीतील वेल प्रमोटेड फिल्म म्हणून चंद्रमुखी सिनेमानं नाव कमावलं. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या सातव्या आठवड्यांनी सिनेमाची ग्रँड सक्सेस पार्टी नुकतीच पार पडली. पार्टीला सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. चंद्रमुखीच्या सक्सेस पार्टीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तो म्हणजे अमृता खानविलकर आणि तिच्या आईच्या (Amruta Khanvilkar And Mom) पार्टीत अमृता खानविलकर आणि आई दणकून नाचताना दिसल्या. पण यावेळी अमृता पेक्षा तिच्या आईचं जास्त कौतुक होतोय. दोघींच्या व्हिडिओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आईसमोर अमृता फेल झाल्याचं म्हटलंय. राजश्री मराठीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. चंद्रमुखीच्या सक्सेस पार्टीत अमृता आणि तिची आई ‘मे तेरा बॉयफ्रेंड’ या गाण्यावर नाचनाता दिसत आहेत. अनारकली ड्रेसमध्ये दणकून नाचणाऱ्या आईसमोर अमृताही थक्क झाल्याचं दिसत आहे. आईबरोबर नाचताना अमृताही थकली पण आई काही थांबायचं नाव घेत नाही. या वयातही इतक्या फिट अँड हेल्दी काकूंना पाहून सर्वांनीच त्यांचं कौतुक केलंय. व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केलाय.

जाहिरात

अमृता आणि तिच्या आईचा डान्स पाहून, नेटकऱ्यांनी म्हटलंय,  ‘आई तशी मुलगी, मुलगी तशी आई, दोघीही अमेझिंग!’.  तर अनेकांनी ‘काकू फार फिट दिसतायत’ असं म्हटलंय. ‘आई समोर अमृता फेल’, असं म्हणत सर्वांनी काकूंचं कौतुक केलंय. हेही वाचा - ही इज बॅक! पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार डॅडींचा दबदबा, दगडी चाळ 2 ‘या’ दिवशी होणार रिलीज अमृता आणि तिच्या आईचं खास नात आहे. अमृताच्या प्रत्येक गोष्टीत आईचा मोठा वाटा आहे. तिच्या प्रत्येक शुटींगला तिची आई तिच्याबरोबर असते. ही गोष्ट अनेकदा अमृताच्या तिच्या मुलाखतींमध्ये सांगितली आहे. सिनेमाची चंद्रा म्हणजे अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, प्रसाद ओकसह सिनेमातील सर्व कलाकारांनी पार्टीला हजेरी लावली. अमृता आणि चंद्रा गाण्याची कोरिओग्राफर दीपाली विचारे या दोघींनी चंद्रा गाण्यावर ठसकेदार डान्सही केली. त्याचप्रमाणे दिग्दर्शक प्रसाद ओकही अमृताबरोबर धम्माल करताना दिसला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात