मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'थलायवी'च्या गाण्यावरील करण जोहरचा डान्स व्हायरल; कंगनाने पुन्हा उडवली खिल्ली

'थलायवी'च्या गाण्यावरील करण जोहरचा डान्स व्हायरल; कंगनाने पुन्हा उडवली खिल्ली

कंगना आणि दिग्दर्शक करण जोहर याच्यातील मतभेदही सर्वानाच माहिती आहेत. सगळ्यात आधी करण जोहरवरच (Karan Johar) तिनं घराणेशाहीचा आरोप लावला होता. त्यानंतरही ती कोणत्या ना कोणत्या कारणानं करण जोहरवर ट्विटरचा मारा करतच असते. आता तिने व्हिडिओ शेअर केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 4 एप्रिल: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) म्हणजे बॉलिवूडमधलं (Bollywood) एक बिनधास्थ व्यक्तिमत्त्व. बीएमसी असो की महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत की शिवेसेना खासदार संजय राऊत कंगनानं कधी सोशल मीडियातून तर कधी प्रत्यक्षपणे सर्वांवर सडकून टीक केली. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर खास करुन ट्टिवटरवरुनही (Tweeter) ती सतत अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडते. तिचे आणि दिग्दर्शक करण जोहर याच्यातील मतभेदही सर्वानाच माहिती आहेत. सगळ्यात आधी करण जोहरवरच (Karan Johar) तिनं घराणेशाहीचा आरोप लावला होता. त्यानंतरही ती कोणत्या ना कोणत्या कारणानं करण जोहरवर ट्विटरचा मारा करतच असते. असंच तिनं करणवर केलेलं एक ट्विट सध्या धुमाकूळ घालतंय. कंगनाने करणचा एक डान्स व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने कंगनाला टॅग करत ट्विटरवर शेअर केला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत करण एका कार्यक्रमात डान्स करताना दिसतो. करणचा हा व्हिडिओ खूप जूना आहे. मात्र कंगनाच्या चाहत्यानं तिच्या आगामी 'थलायवी' या चित्रपटातील चली-चली हे गाणं त्या व्हिडिओत अॅड केलंय.

हा व्हिडिओ पाहून कंगनानं तो लगेच रिट्विट केला आणि त्यावर तिची प्रतिक्रियाही दिलीये. 'आतापर्यंतचा सगळ्यात चांगला व्हिडिओ #ChaliChaliChallenge'असा हॅशटॅग वापर कंगनानं करणचा व्हिडिओ रिट्विट केलाय. या व्हिडिओच्या निमित्तानं करणला ट्रोल करण्यासाठी कंगनाला आयतीच संधी मिळालीये.

'चालबाज इन लंडन'चा टीझर प्रदर्शित; डबल रोलसाठी श्रद्धा कपूर उत्सुक

कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटात कंगना तामिळनाडुच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

First published:

Tags: Kangana ranaut, Karan Johar