'चालबाज इन लंडन'चा टीझर प्रदर्शित; डबल रोलसाठी श्रद्धा कपूर उत्सुक

'चालबाज इन लंडन'चा टीझर प्रदर्शित; डबल रोलसाठी श्रद्धा कपूर उत्सुक

अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. 'चालबाज इन लंडन' (Chalbaaz in london) या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रद्धा कपूर डबल रोल (Double Role) करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल : अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. 'चालबाज इन लंडन' (Chalbaaz in london) या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रद्धा कपूर डबल रोल (Double Role) करणार आहे. 1989 साली श्रीदेवीच्या (Shreedevi) चालबाज चित्रपटाची निर्मिती करणारे पंकज पराशर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, अहमद खान आणि शायरा खान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बागी-3 चित्रपटानंतर श्रद्धा कपूर आणि अहमद खान पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

'मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते. 'चालबाज इन लंडन' या चित्रपटासाठी त्यांनी माझी निवड केल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मला डबल रोल करायला मिळत आहे. एक अभिनेत्री म्हणून मला ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडायची आहे. भूषण सर आणि अहमद सर यांच्यामुळे हे काम करताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत.' असं श्रद्धा कपूरने एका मुलाखतीत सांगितलं.

(वाचा - कोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor, व्हायरल होतोय हा VIDEO)

'चालबाज इन लंडन' माझ्यासाठी एक ड्रिम प्रोजेक्टसारखा असल्याचं मत अहमद खानने व्यक्त केलं आहे. श्रद्धा चांगली अभिनेत्री असून ती या चित्रपटातील भूमिका यशस्वीरित्या पार पाडेल यात शंका नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेसह श्रद्धाची भूमिका प्रेक्षकांना भावेल यात शंका नाही असं अहमद खानने सांगतिलं.

श्रीदेवीच्या चालबाज चित्रपटातील गाण्यावर टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. श्रद्धा कपूरने आपल्या वॉलवर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. चालबाज इन लंडन या चित्रपटाबाबत तिचे चाहतेही खूप उत्सुक आहेत.

Published by: News18 Digital
First published: April 4, 2021, 4:05 PM IST

ताज्या बातम्या