Home /News /entertainment /

कंगना रणौतच्या बॉडीगार्डला अटक; महिलेने केले बलात्काराचे आरोप

कंगना रणौतच्या बॉडीगार्डला अटक; महिलेने केले बलात्काराचे आरोप

कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोप करणारी महिला मुंबईत मेकअप आर्टिस्टचं काम करते.

    मुंबई 30 मे: अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडेवर एका मेकअप आर्टिस्टनं लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Kangana Ranaut's bodyguard arrested) कुमारनं लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार आणि अनैसर्गिकरित्या शोषण केलं असा धक्कादायक आरोप या महिलेनं केला होता. शिवाय त्यानं तिच्याकडून 50 हजार रुपये घेतले ते अद्याप परत केलेले नाहीत असाही दावा तिनं केला. या प्रकरणी तिनं अधिकृत तक्रार देखील दाखल केली होती. परिणामी मुंबई पोलिसांनी कुमारला ताब्यात घेतलं आहे. सेलिब्रेटी मीरा चोपडा लस प्रकरणाची चौकशी होणार; तीन दिवसांत सत्य येणार समोर कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोप करणारी महिला मुंबईत मेकअप आर्टिस्टचं काम करते. तक्रारकर्त्या महिलेची वैद्यकीय चाचणी आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर डीएन नगर पोलिसांनी 19 मे रोजी रात्री गुन्हा नोंदवला. ‘पद्मावतच्या वेळी काय झालं होतं आठवा’; अक्षयच्या ‘पृथ्वीराज’ला करणी सेनेचा इशारा फिर्यादी महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार कुमार हेगडे तिला 2013 साली भेटला होता. वर्षभरापूर्वी त्यानं तिला लग्नासाठी मागणी घातली. तिनं होकार दिल्यानंतर हेगडे तिच्या घरी यायचा आणि बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवायचा. अनेकवेळा त्याने जबरदस्ती केली. 27 एप्रिल रोजी हेगडे तिच्या घरातून रोख रक्कम 50 हजार रुपये घेऊन पळाला. असे आरोप या महिलेने आपल्या तक्रारीत केले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Crime, Kangana ranaut

    पुढील बातम्या