मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सेलिब्रेटी मीरा चोपडा लस प्रकरणाची चौकशी होणार; तीन दिवसांत सत्य येणार समोर

सेलिब्रेटी मीरा चोपडा लस प्रकरणाची चौकशी होणार; तीन दिवसांत सत्य येणार समोर

Meera Chopra covid vaccine controversy: सेलिब्रेटी मीरा चोपडा लसीकरण प्रकरणाची केली जाणार आहे. या संदर्भातील चौकशीचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

Meera Chopra covid vaccine controversy: सेलिब्रेटी मीरा चोपडा लसीकरण प्रकरणाची केली जाणार आहे. या संदर्भातील चौकशीचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

Meera Chopra covid vaccine controversy: सेलिब्रेटी मीरा चोपडा लसीकरण प्रकरणाची केली जाणार आहे. या संदर्भातील चौकशीचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबई, 30 मे: सेलिब्रेटी मीरा चोपडाने (Meera Chopra) ठाण्यात कोविड प्रतिबंधक लस (Covid Vaccine) घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. लसीच्या तुटवड्याअभावी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुर्ते बंद ठेवण्यात आले आहे. असे असताना मीरा चोपडाने ठाण्यात (Thane) कोविड प्रतिबंधक लस घेतली. इतकेच नाही तर मीरा चोपडाचा कोविड सेंटरमध्ये सुपरवायझर (Covid Center supervisor) असल्याचा एक आयकार्डही व्हायरल होत आहे. यावरुन ठाण्यातील भाजप (Thane BJP) नेत्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मीरा चोपडा लस प्रकरणानंतर वाद निर्माण झाल्यावर ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तीन दिवसांत चौकशी केली जाणार असून सेलिब्रेटी मीरा चोपडा खरोखर सुपरवायझर आहे का? लस कोणी दिली? तसेच मीरा चोपडा 45 वर्षांहून अधिकच्या वयोगटात बसतात का? संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

लस घेण्यासाठी सेलिब्रिटी बनली चक्क कोविड सेंटरमधील सुपरवायझर; ठाण्यातील घटना

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राज्यात लसींच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्या बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या केवळ 45 वर्षांहून अधिक वयाच्या आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, असे असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे सांगत चक्क एका महिला सेलेब्रिटीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या महिला सेलिब्रेटीला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले हे देखील तपासावे लागणार आहे. त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्था देखील अडचणीत आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेतील भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली. तसेच सोशल मीडियातही नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Maharashtra, Mumbai