जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / हॉटेलमधील जेवण अभिनेत्याला पडलं महागात; गाडी फोडून लॅपटॉप चोरीला

हॉटेलमधील जेवण अभिनेत्याला पडलं महागात; गाडी फोडून लॅपटॉप चोरीला

हॉटेलमधील जेवण अभिनेत्याला पडलं महागात; गाडी फोडून लॅपटॉप चोरीला

लॅपटॉपमध्ये खुशांकचा काही खासगी डेटा आहे. शिवाय याचा बॅकअप देखील त्याच्याकडे नाही. त्यामुळं सध्या तो अस्वस्थ आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 जून**:** ‘ये चाहते है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता खुशांक अरोरा (Khushank Arora) याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. गाडीतून त्याचा लॅपटॉप चोरी करण्यात आला आहे. (Steal laptop from Khushank Arora’s car) ही घटना जुहू येथे घडली. या प्रकरणी त्यानं जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र या लॅपटॉपमध्ये खुशांकचा काही खासगी डेटा आहे. शिवाय याचा बॅकअप देखील त्याच्याकडे नाही. त्यामुळं सध्या तो अस्वस्थ आहे. ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? करिश्मा कपूरनं सांगितला अनुभव खुशांक लवकरच एका वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यानं जुहू येथील एका रेस्तरॉमध्ये दिग्दर्शकाची भेट घेतली. त्यावेळी रेस्तरॉच्या पार्किग झोनमध्ये त्यानं गाडी पार्क केली होती. परंतु कोणीतरी या गाडीची काच फोडून त्यामधील इतरत्र वस्तू आणि सोबतच लॅपटॉप देखील चोरी केला आहे. सई रे सई… सांगलीची तरुणी कशी झाली मराठीतील सुपरस्टार? मिळालेल्या माहितीनुसार हा अॅपल कंपनीचा लॅपटॉप होता. त्याची किंमत जवळपास 50 हजार रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणी सध्या पोलीस चौकशी करत आहे. सायबर पोलीस देखील या लॅपटॉपचा आयपी अड्रेस ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. चोरानं एकदा काय लॅपटॉप सुरु करुन इंटरनेटशी कनेक्ट केला की लगेचच त्याचं लोकेशन कळेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या लॅपटॉपमध्ये खुशांकचा काही खासगी डेटा आहे. शिवाय याचा बॅकअप देखील त्याच्याकडे नाही. त्यामुळं सध्या तो अस्वस्थ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात