मुंबई 25 जून: प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री ब्रिटनी स्पिअर्स (Britney Spears) हिने आपल्या वडिलांविरोधात आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. वडील जेमी स्पिअर्स तिची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तिनं केला आहे. (#FreeBritney) या प्रकरणात हॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी तिची बाजू घेतली आहे. परंतु यामध्ये भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हिने. “ब्रिटनीला स्वातंत्र्य द्या, महिलांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू नका” अशी मागणी तिने केली आहे.
फरहान अख्तरची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत असलेली शिबानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंद्वारे अनेकदा ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. मात्र यावेळी तिने ब्रिटनी स्पिअर्ससाठी पोस्ट केली आहे. “ब्रिटीनीला स्वातंत्र्य द्या, महिलांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू नका” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करुत तिनं गायिकेच्या वडिलांबाबत आपला राग व्यक्त केला आहे.
लग्नानंतर यामी गौतमला EDचा दणका; आर्थिक गैरव्यहार प्रकरणी पाठवलं समन्स
‘40 वर्षांच्या करिअरमध्ये 600 अॅक्शन सीन’; शरत सस्केनांनी सांगितला 12 सर्जरीचा अनुभव
ब्रिटनी स्पिअर्सचं नेमकं प्रकरण काय आहे?
टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनी गेल्या काही वर्षांपासून नैराश्येमध्ये होती. या काळात जेमी स्पिअर्स तिच्या संपत्तीची देखभाल करत होते. परंतु अभिनेत्री नैराश्येत असल्याचा गैरफायदा घेत त्यांनी कंपनीच्या कामात आर्थिक घोळ घातला, असा आरोप ब्रिटनीने केला आहे. शिवाय या प्रकरणी तिनं कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. तिला तिचं स्वातंत्र्य परत हवं आहे, असं तिनं त्या याचिकेत म्हटलं आहे. शिवाय, “माझे वडील घोटाळेखोर आहेत. त्यांना तुरुंगात टाका.” अशी विनंती देखील तिनं कोर्टात केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bold photoshoot, Bollywood actress, Entertainment, Hollywood