मुंबई, 16 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याचसोबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी तिचा झालेला वादही चांगलाच चर्चेत आहे. एका गाण्याच्या लाँचिंगमध्ये तिने केलेल्या वक्तव्यावरही अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये तिने राजकारणात जाणार का? या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
न्यूज 18 हिंदी शी बातचीत करताना कंगना म्हणाली, मी ज्या पद्धतीची वक्तव्य करते तशी वक्तव्य करून माझं राजकारणात काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे मी भाजपच काय तर कोणत्याही पक्षात जाणार नाही.
याचवेळी कंगना रानौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मात्र स्तुती केली. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते, असं ती म्हणाली. पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करतात त्यातून मलाही धडा मिळाला आहे. कोणत्याही टिकेला न घाबरता आपलं काम कसं करायचं हे मी मोदींकडून शिकले आहे. मी त्यांच्याशी माझी तुलना करणार नाही पण त्यांच्याकडून प्रेरणा तर नक्की घेऊ शकते, असंही ती म्हणाली.
तिने मुलांना कुशीत घेतल्याने मुलं बचावली पण तिचा मात्र जीव गेला
पंतप्रधान एकदम मुरब्बी नेते आहेत आणि मी तर अजून गावठी आणि कच्चीबच्ची आहे. माझ्यामध्ये असं काहीच नाही की माझी मोदींशी तुलना व्हावी, अशी कबुली तिने दिली.
मी पक्षाच्या बंधनात राहू शकत नाही आणि माझ्या रोखठोक शैलीमुळे मला कुणी पक्षात ठेवणारही नाही याची जाणीव मला आहे, असा शेराही कंगनाने मारला.
कंगना रानौत राजकारणात जाणार का याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. पण आता कंगनाने स्वत:च आता राजकारणात जाणार नाही असं सांगितल्याने सध्यातरी या चर्चेवर पडदा पडला आहे.
====================================================================================================
VIDEO : सगळे जण घरातच होते, इमारतीतून बचावलेल्या महिलेचा थरारक अनुभव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Narendra modi, Politics