मुंबई, 16 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत स्पष्टवक्ती आहे. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. ती प्रत्येक बाबीवर तिचे मत स्पष्टपणे मांडते आणि त्याची चर्चा सुरु होते. बॉलीवूड असो की राजकारण, कोणत्याही मुद्द्यावर बोलायला अभिनेत्री कचरत नाही. याशिवाय कंगना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून एक स्टोरी शेअर केली आहे. ज्याची आता चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्रीने नुकताच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत मोठं वक्तव्य केलं आहे. कंगनाने नुकताच इंस्टाग्राम स्टोरीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने एक नोटही लिहिली आहे. तिने लिहिलंय कि, ‘योगीजींनी पहिल्या भेटीत सांगितले, तुम्ही माझ्या बहिणीसारख्याच आहात. त्यामुळे तुमच्या सुरक्षेशी संबंधित काही असेल तर मला सांगा, योगी जी, इतके महान आणि सौम्य व्यक्तिमत्त्व, तुमची यश आणि कीर्ती जगभर पसरो.’
याशिवाय कंगनाने सीएम योगींची प्रशंसा करताना आणखी एक गोष्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘धर्मग्रंथ असे सांगतात की केवळ धर्माचे पालन केल्याने धर्माची स्थापना होत नाही, तर अधर्माचा नाश होतो. अयोध्येला भारताचे रक्षण करणाऱ्या तपस्वी राजांची परंपरा आहे. जय श्री राम.’ असं तिने म्हटलं आहे. Ranveer Singh : मोठ्या प्रोडक्शन कंपनीने सोडली साथ रणवीर सिंगची साथ; अभिनेत्यासह चित्रपट करण्यास दिला नकार कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय अभिनेत्री ‘तेजस’ आणि ‘सीता: द अवतार’ आणि नॉटी बिनोदिनी या चित्रपटात देखील दिसणार आहे. तसेच ती ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. कंगना एका राजाच्या दरबारातील नर्तकी चंद्रमुखीची मुख्य भूमिका साकारणार आहे.
कंगना रणौत सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. कंगना राणौत ‘इमर्जन्सी’ची निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. तिच्या लूकची सगळेकडेच चर्चा होत आहे. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात मिलिंद सोमण, महिमा चौधरी, सतीश कौशिक, अनुपम खेर, श्रेयस तळपदे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कंगनाने या चित्रपटातील सर्व पात्रांचे लूक आधीच उघड केले आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

)







