मुंबई, 06 मार्च: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या कारवाईबाबत (Income Tax Raid) बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) आज पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. तिने एकामागून एक असे तीन ट्विट (Tweet) करत तिचं स्पष्टीकरण दिलं आहे. याचबरोबर तिने अर्थमंत्री आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांना टोमणा मारला आहे. कंगना आणि तापसीमध्ये यापूर्वीही अनेकदा शाब्दिक युद्ध रंगलं आहे. आयकर विभागाच्या छाप्यानंतर तापसीने केलेल्या ताज्या ट्वीटला कंगनाने खोचक प्रतिक्रिया (Kangana reacts on Taapsee's latest Tweet) दिली आहे.
कंगना रणौतने तापसी पन्नूच्या ट्वीटला रिप्लाय करताना लिहिलं की, 'तू नेहमीच स्वस्त राहशील, कारण तु सर्व बलात्कारी लोकांची स्त्रीवादी आहेस. तुमच्या रिंग मास्टर कश्यपवर 2013 मध्येही कर चोरीप्रकरणात छापा टाकला होता. सरकारी अधिकाऱ्यांचा रिपोर्ट समोर आला आहे. तरीही तुम्ही दोषी नसाल, तर कोर्टात जा. तेथून क्लिन चीट मिळवून दाखवा. कमऑन सस्ती'
You will always remain sasti because you are sab rapists ka feminist... your ring master Kashyap was raided in 2013 as well for tax chori... government official’s report is out if you aren’t guilty go to court against them come clean on this ... come on sasti 👍
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 6, 2021
खरं तर, कंगनाने ही प्रतिक्रिया तापसीच्या ट्विटवर दिली आहे. ज्यात तापसीने म्हटलं होतं की, 'माननीय अर्थमंत्र्यांच्या मते, 2013 साली माझ्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकण्यात आला होता, त्यावर 'not so sasti anymore' असं लिहितं तापसीने कंगनावर उपरोधिक टिका केली होती. कारण 'पंगा क्वीन'ने तापसीला अनेकदा स्वस्त कॉपी असं म्हटलं आहे.
(हे वाचा -'Not So Sasti Anymore', आयकर विभागाच्या रेडनंतर तापसीची पहिली प्रतिक्रिया)
3 मार्च रोजी आयकर विभागाने तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मन्टेना यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. आतापर्यंतच्या तपासणीत फॅंटम कंपनीचे सदस्य 650 कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती देऊ शकले नाहीत तसेच तापसी पन्नू देखील 5 कोटी रुपयांची माहिती देऊ शकली नाही, असा आरोप केला जात आहे. आयकर विभागाने 7 बँक लॉकर्सही गोठावली आहेत. आयकर विभागाचे अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात विचारपूस करत आहेत.
(हे वाचा -तापसीच्या बॉयफ्रेंडनं क्रीडा मंत्र्यांकडे मागितली मदत; उत्तर मिळालं...)
कर चोरी प्रकरणी आयकर विभाग आतापर्यंत फॅंटम फिल्म्स प्रोडक्शनच्या मुंबई आणि पुण्यातील 28 ठिकाणी छापे टाकले आहेत. बॉलिवूड स्टार तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरांवर आणि ऑफिसवर देखील छापेमारी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anurag kashyap, Income tax, Kangana ranaut, Taapsee Pannu