मुंबई 5 मार्च: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) घरावर आयकर विभागानं धाड टाकली. आयकर विभागाच्या पथकानं तापसीच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकले. (IT raid Taapsee Pannu) मात्र या कारवाईत त्यांच्या हाती अक्षेपार्ह अशी कुठलीही गोष्ट लागली नाही. दरम्यान ही कारवाई रोखण्यासाठी तापसीचा बॉयफ्रेड मॅथिअस बो (Mathias Boe) यानं भारताच्या क्रीडा मंत्री किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांना विनंती केली. मात्र त्यांनी कायदा सर्वांसाठी समान आहे असं उत्तर त्याला दिलं. “मी सध्या मानसिक तणावात आहे. पहिल्यांदाच मला काही महान खेळाडूमसोबत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. पण याच दरम्यान आयकर विभागानं तापसीच्या घरावर धाड टाकली. या कारवाईमुळं तापसीचे कुटुंबीय त्रस्त आहेत. किरणजी कृपया मदत करा.” अशा आशयाचं ट्विट करुन मॅथिअसनं क्रीडा मंत्र्यांकडे मदतीची याचना केली होती. मात्र त्यांनी त्याची कुठलीही मदत करण्यास नकार दिला.
“कायदा सर्वांसाठी समान आहे. तुम्ही विनंती ही माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे. मी तुम्हाला कुठलीही मदत करु शकत नाही. कृपया तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.” अशा आशयाचं ट्विट करुन किरण रिजिजू यांनी मॅथिअसच्या ट्विटला उत्तर दिलं. त्यांचं हे ट्विट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अवश्य पाहा - ‘हा घोटाळा मला आधिच कळला होता’; कंगनानं केली तापसी-अनुरागची तुलना दहशतवाद्यांशी
Law of the land is supreme and we must abide by that. The subject matter is beyond yours and my domain. We must stick to our professional duties in the best interest of Indian Sports. https://t.co/nIIf5C8TXL
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 5, 2021
‘फँटम फिल्म’आणि ‘क्वान’ या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.