नवी दिल्ली, 29 एप्रिल:आपल्या रोखठोक वक्तव्यामुळं आणि व्टिटसमुळं (Twitt)बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. राजकारण,समाजकारण,कोरोनाची स्थिती आदी विषयांवर नेहमीच ती वक्तव्य करीत असते. यामुळे ती ट्रोलर्सच्या (Trollers) निशाण्यावर येते. परंतु,यामुळे तिचं मतप्रदर्शनतसूभरही कमी होताना दिसत नाही. या उलट ती अधिक आक्रमकपणे आपलं म्हणणं मांडताना दिसते. तिचं हे वागणं आणि मतप्रदर्शन अनेकदा तिच्या फॅन्सलाही आवडत नाही. रोखठोक बोलण्यानं तिलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु,या कोणत्याही गोष्टींचा तिच्या मतप्रदर्शन करण्यावर परिणाम होताना दिसत नाही.
सोशल मिडीयावर (Social Media)सतत अॅक्टिव्ह असणारी कंगना देशा-विदेशातील घडमोडींवर आपलं मत मांडताना दिसते. यामुळे ती बऱ्याचदा ट्रोल देखील होते. परंतु,कंगनाला ट्रोल झाल्यामुळे काहीच फरक पडत नाही. ही बाब ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून वारंवार सिध्द करत असते. सध्या कंगनाचंअसंच एक व्टिट जोरदार चर्चेत आहे. या व्टिटमधील मजकूर पाहता ती अमेरिकेवर (America) खूपच चिडलेली दिसते.
भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती अमेरिकेत चुकीच्याबातम्यांच्या माध्यमातून दाखवली जात असल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. कंगनाने आपल्या व्टिटमध्ये म्हटलं आहे की कोरोनाच्या (Corona)नावाखाली अमेरिकेत भारतातील खोटे फोटो पसरवले जात आहेत. यामुळे देशातील लोकांमध्ये महामारीच्या (Pandemic)अनुषंगाने भिती आणि दहशत पसरत आहे. कंगनाने आपल्या व्टिटमध्ये अमेरिकेच्या या अहवालांवर तीव्र रोष व्यक्त केला आहे.
तिने व्टीटमध्ये लिहीलं आहे, की 11 महिन्यांपूर्वी झालेल्या गॅस गळती दुर्घटनेतील मृतांची छायाचित्रे वापरून साथीविषयी भीती आणि दहशत पसरवली जात आहे. या कृत्यामुळे मला अमेरिकेची लाज वाटते. तसेही लोकशाहीविषयी अमेरिकेचे काय विचार आहेत? तुम्ही ट्रम्प यांच्यासोबत काय केलं हे लक्षात ठेवा. लोकशाहीच्या नावाखाली तुम्ही स्वतःला चीनला कसं विकलं?त्यामुळे उपदेश देऊ नका,गप्प राहा,असे कंगना म्हणते.
'सस्ता माल' कमेंटवर भडकली तापसी पन्नू; अर्वाच्य कमेंटवर सडेतोड उत्तर
कंगनाचे हे ट्विट सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक युझर्सने याविषयावर कंगनाला पाठिंबा दर्शवत व्टिटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कंगना राणावत सातत्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोनाची सदयःस्थिती आणि सरकारवरटीका करणाऱ्यांवर निशाणा साधत असते. त्यामुळे ती अनेकदा ट्रोल होते. कंगनाचं रोखठोक वागणं,तीव्र शब्दांमध्ये मतप्रदर्शन करणं तिच्या फॅन्सला (Fans)देखील पसंत नसतं. त्यामुळे ते देखील बऱ्याचदा नाराजी व्यक्त करीत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India america, Kangana ranaut, USA