मराठी टेलिव्हिजनवरील स्टार प्रवाह चॅनलची मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' नेहमीच चर्चेत राहिली आहे. या मालिकेत आलेले ट्विस्ट्स, चाहत्यांच्या प्रतिक्रिया, गौरीचा नवा लुक इ. मुळे ही सीरियल चर्चेत आहे. मालिकेतील कलाकारांची देखील विशेष चर्चा होते. त्यांच्या पर्सनल लाइफविषयी चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. दरम्यान तुम्हाला माहित आहे का या मालिकेतील जयदीप अर्थात मंदार जाधवची पत्नीही अभिनेत्री आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम 'जयदीप' अर्थात मंदार जाधव याची पत्नी देखील टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री आहे. तिचं नाव मितिका शर्मा असं असून अभिनेत्रीने हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
शनिवारी 2 एप्रिल रोजी या कपलने पाडव्यानिमित्त काही खास फोटो शेअर केले होते. यामध्ये मंदार मितिकासह त्यांची दोन मुलं हिदान आणि रेहान देखील या फोटोत आहेत.
मंदार आणि मितिकाने 22 एप्रिल 2016 रोजी एका छोटेखानी समारंभात एकमेकांशी लग्न केलं. मितिका देखील मनोरंजन इंडस्ट्रीतीलच आहे
मितिका शर्मा जाधवने गुढी पाडव्यादिवशी मराठमोळ्या अंदाजात गुढीसह हा फोटो शेअर केला होता. यामध्ये तिने पारंपरिक नथही घातली आहे
'देवोंके देव महादेव..', 'ख्वाहिश', 'सनातन' अशा प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये काम केलेली मितिका खूपच ग्लॅमरस देखील आहे. तिने अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत
मंदार जाधवसह तिने अलीकडेच पार पडलेल्या 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2022' मध्येही उपस्थिती दर्शवली होती. यावेळी ती ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसली
मितिका आणि मंदार अनेकदा त्यांच्या मुलांसह फोटो पोस्ट करताना दिसतात. हा देखील असाच एक Cute Family Photo!
सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या टीआरपीच्या रेसमध्ये पहिल्या दहामध्ये आहे. याआधी मंदार 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेत दिसला होता. त्याआधी त्याने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 'जय श्री कृष्णा' (2008-09) या हिंदी मालिकेत त्याने श्रीकृष्णाची भूमिका केली होती. याशिवाय तो 'सास बिना ससुराल' या मालिकेतही होता