जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘बॉलिवूडची खरी रक्षणकर्ता मीच…’; कंगना रणौतनं घेतला कोरोनाशी पंगा

‘बॉलिवूडची खरी रक्षणकर्ता मीच…’; कंगना रणौतनं घेतला कोरोनाशी पंगा

‘बॉलिवूडची खरी रक्षणकर्ता मीच…’; कंगना रणौतनं घेतला कोरोनाशी पंगा

‘माझ्याशिवाय बॉलिवूडला कोणीच वाचवू शकत नाही’; करण जोहरला आव्हान देत कंगनानं जाहिर केली ‘थलैवी’ची तारीख

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई 1 एप्रिल**:** अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘थलैवी’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट ठरल्या दिवशीच म्हणजे येत्या 23 एप्रिलल प्रदर्शित होणार आहे. स्वतः कंगनानेच (Kangana Ranaut) ट्विटरद्वारे ही आनंदाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. मात्र कंगनानं थेट कोरोनाशीच पंगा घेत थलैवी ठरल्या दिवशीच प्रदर्शित होईल असं जाहिर केलं आहे. ‘थलैवी’ (Thalaivi) हा चित्रपट नियोजनानुसार 23 एप्रिल रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार असल्याचं ट्विट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी केलं होतं. त्या ट्विटला प्रतिसाद देणारं ट्विट करून कंगनाने या बातमीला पुष्टी दिली. कंगनाने बॉलिवूडमधल्या अन्य दिग्दर्शकांना लक्ष्य करण्याची संधी या वेळीही सोडली नाही. “त्यांनी मला इंडस्ट्रीच्या बाहेर फेकून देण्यासाठी शक्य असेल ते सगळं केलं, ते सगळे टोळीने माझ्याविरुद्ध उभे राहिले, मला घाबरवण्याचा प्रयत्न केला; पण बॉलिवूडचे ठेकेदार करण जोहर (Karan Johar) आणि आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आज लपून बसलेत. सगळे मोठमोठे हिरो लपून बसलेत; पण कंगना रणौत तिच्या टीमसह 100 कोटी रुपये बजेटचा सिनेमा घेऊन बॉलिवूड वाचवायला येतेय”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. अवश्य पाहा - परिणीती चोप्राचा टॉपलेस अवतार; PHOTO सोशल मीडियावर होतोय व्हायरल

    जाहिरात

    अवश्य पाहा - Rajnikant यांनी पटकावला Dadasaheb Phalke पुरस्कार; मिळणार किती रुपयांचं बक्षिस?

    दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनाने असं म्हटलं आहे, “इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल, की ज्या स्त्रीला ती बाहेरची म्हणून सापत्न वागणूक देण्यात आली, तिच शेवटी रक्षणकर्ती (Saviour) ठरली. आपल्याला आश्चर्यचकित करण्याचे अनेक मार्ग जीवनाकडे असतात, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. ‘बुलिवुड चिल्लर पार्टी’ने हे लक्षात ठेवावं, की आपल्या आईविरोधात कधी टोळीबाज होऊ नका. कारण आई ही शेवटी आईच असते.” कंगना रणौतसह थलैवी (Thalaivi) या सिनेमात अरविंद स्वामी, नासर, भाग्यश्री, राज अर्जुन, पूर्णा, मधु बाला आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. ए. एल. विजय या सिनेमाचे दिग्दर्शक असून, के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, रजत अरोरा आणि मदन कार्की यांनी पटकथा लिहिली आहे. दोन एप्रिल 2021 रोजी ‘चली चली’ हे ‘थलैवी’मधलं पहिलं गाणं रिलीज होणार आहे. ‘थलैवी’सह कंगनाचे तेजस (Tejas) आणि धाकड (Dhakad) हे दोन सिनेमे प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. तेजस सिनेमात कंगना एका शीख सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असून, धाकड या अॅक्शन सिनेमात ती एजंट अग्नीची भूमिका साकारणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात