मुंबई 8 एप्रिल: मुंबई-आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. देशातील असो वा बॉलिवूड प्रत्येक विषयावर ती आपले मत मांडत असते. अलीकडेच कंगनाने पुन्हा एकदा ट्विट करून मुव्ही माफियाच्या दहशतीवर (Movie Mafia Terror) निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की अनेक मोठमोठे कलाकार मुव्ही माफिया'च्या भीतीपोटी गुप्तपणे माझं कौतुक करण्यासाठी फोन करतात. आपल्या पोस्टमध्ये तिने बॉलिवूडचा' खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) चंही नाव घेतलं आहे. आता हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
स्क्रीन रायटर अनिरुद्ध गुहानी(AnirudhhGuha)कंगनाबद्दल एक ट्विट केलं होतं. त्याला प्रतिसाद देताना कंगनाने ट्विट केलं आहे.अनिरुद्ध ट्विटमध्ये म्हटलं होतं की बॉलिवूडमध्ये मत मांडणं धोक्याचं ठरू शकतं मात्र, कंगना राणौत एक असमान्य आणि कुठल्याही पिढीत कंगनासारखी एखादीच अभिनेत्री असते.
अवश्य पाहा - सिद्धार्थ-सोनियाचा किसिंग सीन झाला लीक; व्हिडीओ पाहून प्रेक्षक झाले सैराट
Wish an industry of art can be objective when it comes to art, and not indulge in power play and politics when it comes to cinema, my political views and spirituality should not make me a target of bullying, harassment and isolation but if they do, then obviously I will win ...
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 7, 2021
अवश्य पाहा - धक्कादायक! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची आत्महत्या; मुंबईतल्या घरात बंद खोलीत घेतलं पेटवून
हे ट्विट पाहिल्यानंतर कंगनाने लिहिलं की, 'बॉलिवूडमध्ये इतकं शत्रुत्व आहे की इथं माझं कौतुक करणं सुद्धा लोकांना महागात पडू शकतं. मला अक्षय कुमारसारख्या अनेक मोठ्या स्टार्सकडूनसुद्धा बरेचसे सिक्रेट कॉल्स आणि मेसेजेस येतात. त्यांनी थलाईवी (Thalaivi) चित्रपटाचे खूप कौतुक केलं. मात्र,आलिया आणि दीपिकाच्या चित्रपटांप्रमाणे ते जाहीरपणे माझं किंवा माझ्या चित्रपटाचं कौतुक करू शकत नाहीत. मूव्ही माफियाची दहशत.’
कंगना फक्त इतक्यावरच थांबली नाही तर तिने दुसरंट्विट केलं आणि त्यात लिहिलं की,‘कलेशी संबंधित या इंडस्ट्रीनी कलेच्याबाबत ऑबजेक्टिव्ह रहायला हवं. सिनेमाबाबत तरी मध्ये राजकारण आणून सत्तेच्या जोरावर कलेमध्ये नाक खुपसू नये. माझ्या राजकीय आणि आध्यात्मिक विचारांचा मला लक्ष्य करण्यासाठी वापर केला जाऊ नये. पण त्यांनी तसं केलंच तर विजय माझाच होतो.’
कंगना तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या कंगनाला यामुळे अनेक वादांना सामोरे जावे लागले आहे. दरम्यान,कंगनाच्या कामाबद्दल बोलायंच झाल्यास कंगनाचा थलायवी चित्रपट येत्या २४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्रीदिवंगतजयललिता (Jayalalithaa) यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात कंगनाने जयललितांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदी,तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Kangana ranaut