मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /धक्कादायक! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची आत्महत्या; मुंबईतल्या घरात बंद खोलीत घेतलं पेटवून

धक्कादायक! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची आत्महत्या; मुंबईतल्या घरात बंद खोलीत घेतलं पेटवून

बॉलीवूड निर्माता संतोष गुप्ता यांच्या पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.

बॉलीवूड निर्माता संतोष गुप्ता यांच्या पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.

बॉलीवूड निर्माता संतोष गुप्ता यांच्या पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.

मुंबई, 8 एप्रिल- बॉलीवूडमध्ये(bollywood news of suicide) एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होतं चाललेला दिसून येतं आहे. तर दुसरीकडे आत्महत्येचं (bollywood sucide) सत्र सुरूचं असल्याचं समोर येतं आहे. एका चित्रपट निर्मात्याच्या( film producer mumbai)  पत्नी आणि मुलीने मुंबईच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. संतोष गुप्ता (Producer santosh gupta wife daughter commits suicide ) हिंदी चित्रपट निर्माते आहेत. त्यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता आणि सृष्टी यांनी आपल्या राहत्या घरी म्हणजेच मुंबईमधील अंधेरी येथील डीएन नगर इथे ही आत्महत्या आहे. ऐकून अंगावर काटा येईल अशा पद्धतीने या दोघींनी स्वतःला संपवलं. या दोघींनी आपल्या अपार्टमेंटमध्ये खोली बंद करून स्वतःला पेटवून घेतलं. खोलीला आग दिसली, धूर झाल्याने शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला बोलविलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

अस्मिता गुप्ता या 55 वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या.  आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं आहे. आईची ही अवस्था पाहून मुलगी सृष्टीनेसुद्धा आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोघींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अस्मिता 70 टक्के भाजल्या होत्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सृष्टीने ऐरोली नॅशनल बर्न सेंटर मध्ये उपचार सुरू असताना शेवटचा श्वास घेतला.

याबाबत बोलताना डीएन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भरत गायकवाड यांनी सांगितलं की, या प्रकरणामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या मृत्यूच्या घटना दाखल केल्या आहेत. पुढील तपास अजून सुरू आहे. निर्माता संतोष गुप्ता यांनी याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

(हे वाचा:अभिनेता सुशांतसिंह राजपूतवर दिग्दर्शक रामगोपाल वर्मा बनवणार चित्रपट?)

संतोष गुप्ता यांना कमी बजेट चित्रपटांसाठी ओळखलं जातं. त्यांनी 2011 मध्ये ‘फरार या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचबरोबर संतोष यांनी ‘रोमी द हिरो’ ‘आज की औरत’ या चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Sucide