मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सिद्धार्थ-सोनियाचा किसिंग सीन झाला लीक; व्हिडीओ पाहून प्रेक्षक झाले सैराट

सिद्धार्थ-सोनियाचा किसिंग सीन झाला लीक; व्हिडीओ पाहून प्रेक्षक झाले सैराट

एका वेब सीरिजसाठी हा किसिंग सीन शूट केला होता. मात्र हा सीन पाहून प्रेक्षक अवाक् झाले आहेत. तुम्ही तर स्क्रीन तोडून बाहेर याल अशी गंमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर केल्या जात आहेत.

मुंबई 8 एप्रिल: सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) हा छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. अलिकडेच तो बिग बॉस (Bigg Boss) या रिअलिटी शोमध्ये देखील झळकला होता. या शोमुळं त्याचं फॅन फॉलोइंग कमालीचं वाढलं आहे. त्यानं केलेल्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचे लाखो व्ह्यूज मिळतात. याच दरम्यान सिद्धार्थचा एक इन्टिमेट व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यानं एका वेब सीरिजसाठी हा किसिंग सीन शूट केला होता. मात्र हा सीन पाहून प्रेक्षक अवाक् झाले आहेत. तुम्ही तर स्क्रीन तोडून बाहेर याल अशी गंमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर केल्या जात आहेत. (Sonia Rathee Sidharth Shukla kissing video)

ब्रोकन बट ब्‍यूटीफुल (Broken But Beautiful 3) या नव्या वेब सीरिजद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही एक सस्पेंन्स सीरिज आहे. या आगामी सीरिजमधील एक किसिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ अभिनेत्री सोनिया राठीचं (Sonia Rathee) चुंबन घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ ज्या आवेगात तिचं चुंबन घेतो ते दृश्य पाहून प्रेक्षक सैराट झाले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा - सनी लिओनी राहणार मुंबईत; खरेदी केलं 16 कोटींचं आलिशान घर

ब्रोकन बट ब्‍यूटीफुल या सीरिजची निर्मिती एकता कपूरनं केली आहे. या सीरिजच्या तीसऱ्या सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला झळकणार आहे. अलिकडेच या सीरिजचं टायटल ट्रॅक देखील रिलिज झालं होतं. तेव्हा देखील प्रेक्षकांचा असाच उत्साह पाहायला मिळाला होता. आता सीन लीक झाल्यामुळं या सीरिजबाबत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Live video viral, Marathi entertainment, Web series