मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘थलैवी’साठी काहीही...; कंगना रणौत 24 तास उभी राहिली पाण्यात

‘थलैवी’साठी काहीही...; कंगना रणौत 24 तास उभी राहिली पाण्यात

चित्रपटातील गाण्याचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हे गाणं पाहून प्रेक्षकांना जयललिता यांच्या गाण्यांची आठवणं येईल असा दावा कंगनानं केला आहे.

चित्रपटातील गाण्याचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हे गाणं पाहून प्रेक्षकांना जयललिता यांच्या गाण्यांची आठवणं येईल असा दावा कंगनानं केला आहे.

चित्रपटातील गाण्याचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हे गाणं पाहून प्रेक्षकांना जयललिता यांच्या गाण्यांची आठवणं येईल असा दावा कंगनानं केला आहे.

मुंबई 1 एप्रिल: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘थलैवी’ (Thalaivi) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट ठरल्या दिवशीच म्हणजे येत्या 23 एप्रिलल प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटातील गाण्याचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हे गाणं पाहून प्रेक्षकांना जयललिता यांच्या गाण्यांची आठवणं येईल असा दावा कंगनानं केला आहे.

चली चली असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याचं चित्रीकरण तब्बल 24 तास सुरु होतं. अन् तितका वेळ कंगना पाण्यातच उभी होती. शिवाय हे गाणं पाहून प्रेक्षकांना जयललिता यांच्या ‘वेणीरा अडाई’ या चित्रपटाची आठवण येईल. कारण 55 वर्षांपूर्वी तयार केलेल्या या चित्रपटातील काही दृश्य हुबेहुब रंगवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं या गाण्यात केला असा दावा कंगनाद्वारे केला जात आहे. या गाण्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अवश्य पाहा - ‘बॉलिवूडची खरी रक्षणकर्ता मीच…’; कंगना रणौतनं घेतला कोरोनाशी पंगा

" isDesktop="true" id="536207" >

अवश्य पाहा - बॉलिवूडचा अजब खेळ; चित्रपट सुपरहिट होताच अभिनेत्री होतात रिप्लेस

'थलैवी' (Thalaivi) हा चित्रपट नियोजनानुसार 23 एप्रिल रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार असल्याचं ट्विट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी केलं होतं. त्या ट्विटला प्रतिसाद देणारं ट्विट करून कंगनाने या बातमीला पुष्टी दिली. कंगनाने बॉलिवूडमधल्या अन्य दिग्दर्शकांना लक्ष्य करण्याची संधी या वेळीही सोडली नाही. “त्यांनी मला इंडस्ट्रीच्या बाहेर फेकून देण्यासाठी शक्य असेल ते सगळं केलं, ते सगळे टोळीने माझ्याविरुद्ध उभे राहिले, मला घाबरवण्याचा प्रयत्न केला; पण बॉलिवूडचे ठेकेदार करण जोहर (Karan Johar) आणि आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आज लपून बसलेत. सगळे मोठमोठे हिरो लपून बसलेत; पण कंगना रणौत तिच्या टीमसह 100 कोटी रुपये बजेटचा सिनेमा घेऊन बॉलिवूड वाचवायला येतेय”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

First published:

Tags: Kangana ranaut, Marathi entertainment