मुंबई 25 एप्रिल**:** बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा तिच्या बाबतीत घडला आहे. यावेळी तिनं अभिनेत्री तापसी पन्नूबाबत (Taapsee Pannu) वादग्रस्त विधान केलं आहे. “ती एक शी-मॅन आहे” ‘She-Man’ असं तिनं म्हटलं होतं. मात्र यामुळं नेटकरी तिच्यावर संतापले. परिणामी संतापलेल्या नेटकऱ्यांना शांत करण्यासाठी कंगनाला आता स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. अवश्य पाहा -
‘सामान्य लोकांना देखील वेळ द्या’; सलमान खानच्या बॉडीगार्डला भेटणारे आरोग्यमंत्री झाले ट्रोल अर्बन डिक्शनरी या ट्विटर हँडलवरुन कंगनाचं एक जुनं ट्विट पोस्ट करण्यात आलं होतं. या ट्विटमध्ये कंगनानं तापसीवर टीका केली होती. दरम्यान या ट्विटला प्रतिक्रिया देताना कंगनानं तिला शी-मॅन असं म्हटलं. मात्र तिचं हे ट्विट पाहून काही नेटकरी संतापले. तू काय बोलतेस ते तुला तरी कळतं का? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन स्वत:च्या इभ्रतीचे वाभाडे काढून घेत आहेस अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत ट्रोलर्सनं तिच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. अवश्य पाहा -
“कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का?”; पाकिस्तानची स्तुती केल्यामुळं भडकले भारतीय
अखेर वाढत्या टीकेला रोखण्यासाठी कंगनानं देखील मग स्पष्टीकरण दिलं. शी-मॅन ही काही शिवी नाही. तुम्ही या शब्दाकडं नकारात्मक विचारानं का पाहता. उलट मी तापसीची स्तुतीच केली आहे. अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं स्पष्टीकरण दिलं. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी कंगना पाकिस्तानची स्तुती केल्यामुळं चर्चेत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.