Home /News /entertainment /

‘सामान्य लोकांना देखील वेळ द्या’; सलमान खानच्या बॉडीगार्डला भेटणारे आरोग्यमंत्री झाले ट्रोल

‘सामान्य लोकांना देखील वेळ द्या’; सलमान खानच्या बॉडीगार्डला भेटणारे आरोग्यमंत्री झाले ट्रोल

आरोग्यमंत्री सलमानच्या बॉडिगार्डसोबत मिटिंग करण्यात व्यस्त; फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

    मुंबई 25 एप्रिल: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. वाढत्या संक्रमणामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत राजस्थानचे आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा (Dr. Raghu Sharma) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) बॉडिगार्डसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. यामुळं त्यांच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही पण सलमान खानच्या बॉडिगार्डला भेटायला पुरेसा वेळ आहे असे टोले त्यांना सोशल मीडियाद्वारे लगावले जात आहेत. डॉ. रघु शर्मा यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करुन सलमान खानच्या बॉडिगार्डला भेटल्याची माहिती दिली. “आज मी गुरमित सिंह जॉली उर्फ शेरा यांची भेट घेतली.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी शेअर केलं होतं. मात्र त्यांचं हे ट्विट पाहून नेटकरी संतापले आहेत.  अवश्य पाहा - “कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का?”; पाकिस्तानची स्तुती केल्यामुळं भडकले भारतीय “व्वा मंत्रीजी व्वा.. राज्यात कोरोनानं थैमान घातला आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोक आपल्या समस्या घेऊन तुमच्याकडे येतायेत मात्र त्यांना भेटण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. परंतु सेलिब्रिटींच्या बॉडिगार्डला भेटायला वेळ असतो. त्यांच्या समस्यांकडे तुम्ही जातीनं लक्ष देता.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर आपला संताप व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासांत करोनाचे 67,160 नवे रुग्ण आढळले असून, 676 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 6 लाख 94 हजार रुग्ण हे उपचाराधीन आहेत. सर्वाधिक 1 लाख 8 हजार रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. मुंबई शहरातील नवे रुग्ण आढळण्याची तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. दिवसभरात मुंबई 5888, नाशिक शहर 2875, उर्वरित नाशिक जिल्हा 1881, नगर जिल्हा 3547, जळगाव 941, पुणे शहर 4118, पिंपरी-चिंचवड 2431, उर्वरित पुणे जिल्हा 3476, सातारा 1912, सोलापूर 1778, सांगली 1305, औरंगाबाद जिल्हा 1684, लातूर 1363, यवतमाळ 1427, नागपूर शहर 5417, उर्वरित नागपूर जिल्हा 2616, चंद्रपूर 1742 नवे रुग्ण आढळले. मृतांमध्ये मुंबई 71, ठाणे जिल्हा 26, रायगड 20, नाशिक विभाग 82, पुणे विभाग 94, मराठवाडा 153, विदर्भ 185 जणांचा समावेश आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Covid-19 positive, Salman khan

    पुढील बातम्या