मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'इंदिरा गांधी' साकारल्यानंतर कंगना राणौतला वाटतेय या गोष्टीची भीती; म्हणाली...

'इंदिरा गांधी' साकारल्यानंतर कंगना राणौतला वाटतेय या गोष्टीची भीती; म्हणाली...

आपल्या बिनधास्त स्वभावामुळे अभिनेत्री कंगना राणौत ओळखली जाते. पंगा क्वीन अशी ओळख असलेली कंगना सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अशातच कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 17 सप्टेंबर : आपल्या बिनधास्त स्वभावामुळे अभिनेत्री कंगना राणौत ओळखली जाते. पंगा क्वीन अशी ओळख असलेली कंगना सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अशातच कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. ती अनेकदा चित्रपटाशी संबंधित खास गोष्टी सोशल मीडियावर शेअर करते. नुकतंच तिने नवी पोस्ट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

कंगना राणौतने सोशल मीडियावर 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी पात्र साकारताना स्वतःला कुठेतरी हरवलं असल्याचं म्हटलं आहे.  'इमर्जन्सी' चित्रपटातील व्यक्तिरेखेत कंगना इतकी डुंबली की तिला आपली ओळख गमावण्याची भीती वाटू लागली. याविषयी कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा-  Jacqueline Fernandez आणि महाठग सुकेश चंद्रशेखरच्या नात्याचा अखेर खुलासा; समोर आलं सत्य

कंगनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'आज ब्रेक जे आहे. मी याला ब्रेक डे न म्हणता पॉज डे म्हणेल. तुमच्या फावल्या वेळात, तुम्ही स्वतःला कुठे हरवून बसलात याचं आश्चर्य वाटते. आपण एखाद्या पात्रात एवढे गढून जातो की स्वतःचं काहीच उरलं नाही असं वाटतं. तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे तुमच्या स्वतःच्या चित्रांकडे पाहता आणि तुम्हाला पुन्हा असे बनता येईल का असे वाटते, सत्य हे आहे की तुम्ही पुन्हा कधीही तीच व्यक्ती होऊ शकत नाही'.

कंगना पुढे म्हणते की, 'सत्य हे आहे की तुम्ही कधीही एकसारखे व्यक्ती राहू शकत नाही. एकदा का तुम्ही पात्रात शिरलात की ते तुमच्या आत्म्याला खुणावत राहते. रात्रीच्या अंधाराप्रमाणे, चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे, एक पात्र तुमच्याशी जोडले जाते'.

दरम्यान, कंगनाशिवाय 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे आणि मिलिंद सोमण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Instagram post, Kangana ranaut, Upcoming movie