मुंबई 1 जून: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या चर्चेत आहे. जुई आता मालिकांत दिसत नसली तरीही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या मालिकांमधील भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. पण आता ती टीव्हीवर जास्त दिसत नसल्याने काहींनी तिला ट्रोल केलं. मात्र, तिनेही त्या युझरला चांगलचं उत्तर दिलं आहे. (Jui Gadkari replies to user)
‘पुढचं पाऊल’ (Pudhcha Paul), ‘तुझविन सख्या रे’ अशा अनेक मालिकांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण आता जुई मालिकांमध्ये जास्त दिसत नाही. मात्र सोशल माडियावर ती फार सक्रिय असते. तेव्हा एका युझरच्या कमेंटवर जुईने रिप्लाय दिला आहे.
सचिनची 'एकुलती एक' आहे फारच ग्लॅमरस! पाहा Latest PHOTO
त्या युझरने लिहिलं होतं, ‘सोशल मीडियावर जर तुला स्थिरस्थावर व्हायचं असेल तर तुला वादविवाद करणं आवश्यक आहे. अलका कुबल (Alka Kubal) बनून राहशील तर तुझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. पण बघ ट्राय कर.. सॉरी मला अलकाजींवर टीका करायची नाही पण इतका ताणलेला नम्र, सोज्वळ स्वभाव इकडे चालत नाही. प्लॅटफॉर्मवर सगळं हॉट पाहिजे असतं.’
यावर जुईनेही त्या युझरला रिप्लाय देत म्हटलं, ‘तुमच्या सुचनांसाठी धन्यवाद. पण मला हॉटनेसमध्ये इन्ट्रेस्ट नाही. ज्यांना मी आवडते ते माझ्याकडे नक्की बघतील. असो तुम्हाला शुभेच्छा.’ असा रिप्लाय जुईने त्या युझरला दिला. यानंतर जुईला अनेक कमेंट्स आल्या. तर अनेकांनी तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
‘विश्वास ठेवा तुम्हाला सर्वकाही शक्य आहे’; अमृता खानविलकरनं दिला Fitness Mantra
जुईला ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तिचं कल्याणी हे सोज्वळ सुनेचं पात्र विशेष लोकप्रिय ठरलं होतं. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’ आणि ‘वर्तुळ’ या मालिकांमध्ये दिसली होती. पण आता मात्र ती छोट्या पडद्यापासून दूर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.