कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग हे नाव आता नवं नाही. आपल्या विनोदी शैलीने नेहमीच ती प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. आज भारतीचा वाढदिवस, त्यानिमित्त जाणून घ्या भारतीच्या लव्हलाईफ विषयी. २०१७ साली भारतीने कॉमेडी लेखक हर्ष लिंबाचियासोबत विवाह केला होता. पाहा कशी होती दोघांची प्रेमकहानी.
भारतीचा जन्म ३ जुलै १९८६ला अमृतसरमध्ये झाला होता. भारतीने आजवर अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे. एका शोमध्येच दोघांची ओळख झाली होती.
कॉमेडी सर्कसमध्ये काम करत असताना दोघांची चांगली ओळख झाली होती. हर्ष हा स्क्रिप्ट रायटर होता तर भारती कॉमेडीयन.
दरम्यान हर्षच्या स्क्रिप्टमुळे अनेक स्पर्धक आधीच शो बाहेर गेले होते. तर भारतीलाही शो बाहेर जाव लागलं होतं. पण या दरम्यान त्यांची अगदी जवळची आणि घट्ट मैत्री निर्माण झाली होती.
पण भारतीच्या विनोदी अभिनय कौशल्यांमुळे भारतीला पुन्हा एकदा वाइल्डकार्ड एन्ट्री मिळाली होती. तेव्हा हर्षमुळे शो सोडावा लागला तरीही भारतीने त्याच्याच स्क्रिप्टवर काम करणं पसंत केलं होतं. व याच दरम्यान हर्षला भारती फारच आवडू लागली होती. व त्यानंतर त्याने भारतीला प्रपोज केलं.
भारतीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "मला वाटलं नव्हतं की कधी हर्षसारखा मुलगा मला प्रपोज करेन, मला वाटायचं माझ्यासारख्या जाड मुलीला कोण प्रपोज करणार?, माझ लग्न कोण्या जाड मुलाशीच होइन."
यावर हर्ष म्हणाला की, "मला भारती कशी दिसते यापेक्षा ती मनाने किती चांगली आहे हे महत्त्वाचं आहे." व खूप कमी लोकांना माहीत आहे की भारती आणि हर्ष यांनी जवळपास ६ वर्ष एकमेकांना डेट केलं होतं.
खऱ्या आयुष्यातही तितकीच विनोदी असणारी ही जोडी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. त्यांचे सुंदर फोटो नेहमी शेअर करत असतात.