मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shruti Hasan Kamal Hasan : श्रुती हसनची आई सारिका लग्नाआधीच होती प्रेग्नंट, धक्कादायक माहितीसमोर

Shruti Hasan Kamal Hasan : श्रुती हसनची आई सारिका लग्नाआधीच होती प्रेग्नंट, धक्कादायक माहितीसमोर

सारिकाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ती लहान असताना तिचे आई-वडील वेगळे झाले, ती मोठी झाल्यावर तिचं पतीशी जमलं नाही

सारिकाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ती लहान असताना तिचे आई-वडील वेगळे झाले, ती मोठी झाल्यावर तिचं पतीशी जमलं नाही

सारिकाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ती लहान असताना तिचे आई-वडील वेगळे झाले, ती मोठी झाल्यावर तिचं पतीशी जमलं नाही

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जानेवारी : फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार संघर्ष करून यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. कोणताही गॉडफादर नसताना स्वतःची मेहनत व अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत नाव कमवलं. 1980-90 च्या दशकातील अनेक कलाकार हे कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून फिल्म इंडस्ट्रीत आले आणि इथे यशस्वी झाले. आज आपण अशाच एका अभिनेत्रीच्या आयुष्याबद्दल बोलणार आहोत, तिचं नाव आहे सारिका.

सारिकाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ती लहान असताना तिचे आई-वडील वेगळे झाले, ती मोठी झाल्यावर तिचं पतीशी जमलं नाही आणि शेवटी तिला घटस्फोट घ्यावा लागला. इतकंच नाही तर, सारिकाच्या मुलींनाही तिच्याबरोबर राहायचं नव्हतं. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय.

हे ही वाचा : ऑस्करसाठी जॅकलिनच्या 'अप्लॉज' गाण्यालाही नॉमिनेशन; 'नाटू नाटू' बरोबर होणार टक्कर

सारिका केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारिका लहान असताना तिचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले होते. सारिकाच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडून दिलं होतं, असं म्हटलं जातं. वडील नसल्याने त्यांना कायम आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.

त्यामुळे सारिका लहान असल्यापासूनच काम करू लागली. तिचं आईशी कधीचं फार जमलं नाही, तिची आई तिला डॉमिनेट करायची आणि सर्व पैसे स्वतःजवळ ठेवून घ्यायची असं म्हटलं जातं. सारिकाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळे ती आईला सोडून चेन्नईला आली आणि काम मिळवण्यासाठी संघर्ष करू लागली.

सारिकाला चित्रपटांमध्ये काम मिळू लागलं. काम करत असतानाच ती तमीळ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कमल हसनला भेटली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. सारिका लग्नाच्या आधीच गरोदर राहिली होती. तिने मुलगी श्रुतीला 1986 साली जन्म दिला आणि कमल हसनशी 1988 मध्ये तिने लग्न केलं होतं. पण, लग्न टिकू शकलं नाही.

हे ही वाचा : Throwback Bollywood: ऐश्वर्या रायसोबत सेटवर घडलेला भयानक अपघात; 'तो' सीन बेतला होता जीवावर

16 वर्षांनी तिचा आणि कमल हसनचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सारिकाच्या मुली श्रुती व अक्षरा यांनीही तिच्याबरोबर राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे सारिकाला धक्का बसला होता. सारिका अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. अलीकडेच त्यांनी अमिताभ बच्चन, अनुपम खेर व बोमण इराणी अभिनीत 'उंचाई' चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय तिने काही वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Film star, Kamal hassan