मुंबई, 25 जानेवारी- आजपर्यंत आपण अनेक मोठ-मोठ्या चित्रपटांमध्ये धडकी भरवणारी दृश्ये पाहिली आहेत. अनेक चित्रपटांमध्ये कलाकार स्वतः भयानक स्टंट करायला स्वतः तयार होतात. तर काही वेळा अवघ्या साध्या-साध्या दृश्यांमध्ये भयानक अपघात घडतात. आजपर्यंत अनेक चित्रपटांच्या सेटवर भयानक अपघात घडले आहेत. यामध्ये कधी एखादा अभिनेता तर कधी एखादी अभिनेत्री जखमी झालेली पाहायला मिळाली आहे. अभिनेता सलमान खानपासून ते अभिनेत्री ऐश्वर्या रॉयपर्यंत अनेक कलाकार आपल्या चित्रपटांच्या सेटवर अपघाताला बळी पडले आहेत. आज आपण ऐश्वर्या रॉयसोबत घडलेला भयानक प्रकार जाणून घेणार आहोत.
2004 मध्ये 'खाकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, संजय दत्त, तुषार कपूर, ऐश्वर्या रॉयसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती. भारतीय पोलीस दलावर आधारित असणाऱ्या या चित्रपटामध्ये अनेक थरारक स्टंटसुद्धा पाहायला मिळाले होते. मोठमोठे कलाकार असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आला होता. त्याचं कारण होतं ऐश्वर्या रॉयसोबत घडलेला भयानक अपघात.
'खाकी'च्या सेटवर घडलेला अपघात-
2004 मध्ये आलेल्या 'खाकी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रींसोबत अपघात घडला होता. 2003मध्ये जेव्हा या चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं, तेव्हा हा प्रकार घडला होता. एका सीनदरम्यान ऐश्वर्या रॉयला भरधाव येणारी जीप थांबवून त्यामध्ये चढायचं होतं. परंतु सीनदरम्यान येणारी जीप इतकी भरधाव होती की, त्यावर ताबा ठेवणं कठीण झालं आणि यादरम्यान एक अपघात घडला ज्यामध्ये ऐश्वर्या रॉयचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याकाळात हा अपघात प्रचंड चर्चेत आला होता. ऐश्वर्याचे चाहते प्रचंड चिंतेत होते. मात्र ऐश्वर्या यातून सुखरूप बचावली होती.
ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय-
ऐश्वर्या सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. खासकरून ऐश्वर्या आपल्या लेकीसोबतचे गोंडस फोटो शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरुन प्रेम करत असतात. आपल्या इन्स्टावर ऐश्वर्याने आपल्या आई वडिलांचेही अनेक फोटो शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर ऐश्वर्याचे तब्बल 11. 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे ऐश्वर्याने केवळ अभिषेक बच्चनला फॉलो केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aishwarya rai, Bollywood, Entertainment