मुंबई, 26 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस मागच्या वर्षभरापासून सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिग प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ईडीनं चार्जशीट दाखल केल्यानं जॅकलिन सारख्या दिल्लीत पटियाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी घडामोड घडली असली तरी तिच्या प्रोफेशन आयुष्यात मात्र एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसच्या 'टेल इट लाइक अ वुमन' या सिनेमातील 'अल्पॉज' या गाण्याला ऑस्कर 2023चं नामांकन मिळालं आहे. बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमध्ये हे नामांकन मिळालं आहे. त्यामुळे आता कुठेतरी जॅकलिनला दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल.
जॅकलिनच्य 'अल्पॉज' गाण्याला 'डियेर वारेन' यांनी आवाज दिला आहे. गाण्याला नामांकन मिळताच अभिनेत्रीनं आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जॅकलिननं म्हटलंय, 'सध्या सगळं शब्दांच्या पलीकडे आहे. डायन वॉरेन आणि सोफिया कार्सन यांचं खूप खूप अभिनंदन. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही केलेल्या सुंदर सिनेमाशी माझं नाव जोडलं गेलं आहे हा मी माझा सन्मान समजते. तुम्ही खूप चांगले कलाकार आहात'.
हेही वाचा - Throwback Bollywood: ऐश्वर्या रायसोबत सेटवर घडलेला भयानक अपघात; 'तो' सीन बेतला होता जीवावर
View this post on Instagram
ऑस्करच्या नामांकनात 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यालाही ऑस्कर नामांकन मिळालं आहे. जॅकलिननं 'नाटू नाटू' गाण्याला देखील शुभेच्छा दिल्यात. 'आरआरआरच्या नाटू नाटू गाण्यासाठी खूप शुभेच्छा. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्याबरोबर राहतील. अभिनंदन'.
दरम्यान आता आरआरआरमधील 'नाटू नाटू' आणि जॅलकिनचं 'अल्पॉज' ही दोन गाणी ऑस्करसाठ समोरासमोर आली आहेत. नाटू नाटू गाण्याला नुकताच गोल्डन ग्लोबल अवॉर्डही मिळाला आहे. त्याचप्रमाणे गाण्याला बेस्ट क्रिटिक चॉइस अवॉर्डही देण्यात आला. आता कोणतं गाणं ऑस्करच्या शर्यतीत पुढं पर्यंत पोहोचू शकत हे 13 मार्चला होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डमध्येच पाहायला मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress