मुंबई, 12 फेब्रुवारी : अभिनेत्री कल्कि केकलांनं काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. कल्किनं बॉयफ्रेंड गाय हर्षबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये असताना लग्नाआधीच आई होण्याचा निर्णय घेतला होता. कल्कि सध्या तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे. कल्कि आणि गाय यांनी त्यांच्या मुलीचं नाव Sappho असं ठेवलं आहे. नुकतीच कल्किनं तिच्या मुलीच्या फुटप्रिंटचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. पण आता कल्किनं मुलीच्या जन्मावेळी अचानक घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयाचा खुलासा केला आहे.
कल्किनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीचे फॅमिलीसोबतचे फोटो शेअर केले. याशिवाय तिनं प्रसुतीच्यावेळी तिच्यासोबत असलेल्या हॉस्पिटल टीमचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं मुलीच्या जन्मावेळचा अनुभव शेअर करत त्यावेळी घेतलेल्या धक्कादायक निर्णयाचीही कबुली दिली.
लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत होती नेहा कक्कर, आता व्हायरल झाले ‘असे’ PHOTO
कल्किनं यापूर्वीच ती मुलीला वॉटरबर्थ तंत्रज्ञानाच्या मदतीनं जन्म देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण प्रसुती वेदना सहन न झाल्यानं कल्किनं ऑपरेशनच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये कल्किनं लिहिलं, ट्यूलिप वुमन केअरच्या संपूर्ण टीमचे खूप आभार. 17 तास प्रसुती वेदना सहन केल्यानंतर मी हार मानली होती आणि मी डॉक्टर्सना विनंती केली की काहीही करा पण माझ्या या दुनियेत आणा. यावर डॉक्टर मला म्हणाले, तू एवढी महेनत करून वॉटरबर्थ करण्याचा प्रयत्न केला आहेस तर मग आणखी काही काळ हे सहन कर हिंमत हारू नकोस आणि त्यानंतर जवळापास 1 तासानं Sappho चा जन्म झाला.
मलायकाशी लग्न करण्यास अर्जुन का करतोय टाळाटाळ, समोर आलं कारण
काही दिवसांपूर्वी कल्किनं तिच्या मुलीच्या फुटप्रिंटचा फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, कृपया Sappho चं या जगात स्वागत करा. 9 महिने ती मोमोज प्रमाणे गर्भाशयात होती. आता या जगात तिला जागा द्या. असं म्हणत कल्किनं तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. कल्किनं लग्नाआधीच आई होण्याचा निर्णय घेतल्यावर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं मात्र तिनं कोणत्याही गोष्टीला महत्त्व दिलं नाही. ती तिच्या निर्णयावर खूश होती. तिच्या मुलाच्या नावाबद्दल बोलायचं तर Sappho हा एक ग्रीक शब्द आहे.
साराला भरवताना कार्तिक आर्यनचा फोटो VIRAL, कॅप्शन एकदा वाचाच