साराला भरवताना कार्तिक आर्यनचा फोटो VIRAL, कॅप्शन एकदा वाचाच

साराला भरवताना कार्तिक आर्यनचा फोटो VIRAL, कॅप्शन एकदा वाचाच

सारा-कार्तिकचा लव्ह आज कल (Love Aaj Kal) येत्या Valentine Day ला प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघांनीही कंबर कसली आहे. नुकताच कार्तिकने साराबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये अगदी प्रेमाने कार्तिक साराला जेवण भरवताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : सारा अली खान आणि कार्तिक आर्यनने आतापर्यंत जरी स्क्रीन शेअर केलं नसलं तरी त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील पसंती दिली आहे. सारा-कार्तिकचा लव्ह आज कल (Love Aaj Kal) येत्या Valentine Day ला प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघांनीही कंबर कसली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत सारा आणि कार्तिक चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकताच कार्तिकने साराबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये अगदी प्रेमाने कार्तिक साराला जेवण भरवताना दिसत आहे. हा फोटो सारा-कार्तिकच्या इतर फोटोंप्रमाणे व्हायरल होत आहे आणि फॅन्सदेखील मजेशीर कमेंट्स करत आहे.

 

View this post on Instagram

 

Kaafi dubli ho gayi ho Aao pehle jaisi sehat banayein

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

हा फोटो देखील मजेशीर आहे कारण कार्तिकने या फोटोला दिलेलं कॅप्शन ! लव्ह आज कलच्या शूटिंग दरम्यानचा हा फोटो आहे. ‘खूपच बारीक झाली आहेस. चल, पहिल्यासारखी तब्येत बनवूया’ असं कॅप्शन देत कार्तिकने साराची गंमत करायचा प्रयत्न केला आहे. कार्तिकच्या या फोटोंला जवळपास 20 लाखांहून अधिक युजर्सनी लाईक केलं आहे.

(हेही वाचा- प्रेम की मैत्री? Valentine Week मध्ये पूजा-भूषणच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा)

Valentine Day ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आजकल’चा सिक्वेल आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  लव्ह आज कलनंतर सारा अली खान आणि कार्तिकचे विविध चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सारा ‘कुली नंबर 1’ मध्ये दिसणार आहे, तर अक्षय कुमार आणि धनुषबरोबर ती ‘अतरंगी रे’ हा सिनेमा देखील करणार आहे. कार्तिक देखील बहुचर्चित ‘भूलभुलैया 2’ मध्ये दिसणार आहे.

First published: February 11, 2020, 8:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या