• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'Anek 'ची रिलीज डेट जाहीर; समोर आला आयुष्मान खुरानाचा 'FIRST LOOK'

'Anek 'ची रिलीज डेट जाहीर; समोर आला आयुष्मान खुरानाचा 'FIRST LOOK'

बॉलिवूड(Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाचा(Ayushmann Khurana) आगामी चित्रपट 'अनेक' साठी चाहते खूपच उत्सुक आहेत. या अभिनेत्याने नुकताच या चित्रपटातून त्याचा पहिला लूक शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई,21ऑक्टोबर- बॉलिवूड(Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाचा(Ayushmann Khurana) आगामी चित्रपट 'अनेक' साठी चाहते खूपच उत्सुक आहेत. या अभिनेत्याने नुकताच या चित्रपटातून त्याचा पहिला लूक शेअर केला आहे. जो लोकांना फारच आवडत आहे. यासोबतच त्याने चित्रपटाच्या रिलीज डेटवरुनही पडदा उठवला आहे. आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लूकसह, त्याच्या चाहत्यांना सूचित केलं आहे की चित्रपट खूप मजेदार असणार आहे. अनुभव सिन्हाने 'अनेक'(Anek Release Date) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.
  बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने काही वेळेपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये आयुष्मानच्या कपाळावर आठ्या पडलेल्या आहेत. आणि चेहऱ्यावर थकवा आणि त्रास दिसत आहे. तो लोकांच्या विरुद्ध चालताना दिसत आहे. आयुष्मान खुरानाची इन्स्टाग्राम पोस्ट- पोस्ट शेअर करत आयुष्माननं लिहिलं आहे, 'एका अशा पात्रासाठी ज्याने मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं. त्यासाठी अनुभव सिन्हा यांच्यासोबत पुन्हा एकत्र आल्याने मी रोमांचित अनुभव घेत आहे. यासाठी भूषण कुमार यांचं समर्थन मिळालं आहे. 'अनेक' हा प्रोजेक्ट् चित्रपटाच्या वेगळ्या भाषेची सुरुवात करेल'. यानंतर, त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सर्वांसमोर आणली आहे. 'हा चित्रपट पुढील वर्षी 31 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे'. (हे वाचा:संजय लीला भन्साळीची ड्रीम वेबसीरीज 'हीरामंडी'मध्ये किती आहेत गाणी?जाणून घ्या....) या चित्रपटात तो जोशुआची भूमिका साकारत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच हे पात्र खूप आवडलं आहे. याशिवाय तो 'चंदीगड करे आशिकी' चित्रपटात दिसणार आहे. तसेच, तो जंगली पिक्चर्सच्या चित्रपट 'डॉक्टर जी' मध्ये अभिनेत्री रकुलप्रीत सिंगसोबत दिसणार आहे. प्रत्येक वेळी अनुभव सिन्हा आपल्या चित्रपटांमधून अस काहीतरी घेऊन येतो, जे प्रेक्षकांना खोलवर विचार करायला भाग पाडतं. त्यांनी 'आर्टिकल 15', 'थप्पड', 'मुल्क', 'रॉ वन' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शिन केलं आहे. ज्यांच लोकांनी खूप कौतुक केल आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: