मुंबई, 21 फेब्रुवारी- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी **( Sonalee Kulkarni )**सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ देखील शेअर करत असते. तसेच तिच्या कामाच्याबद्दल देकील अपडेट देत असते. नुकतीच सोनालीने एक पोस्ट केली आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. हरली पण पुरस्कार देऊन गेली.. अशी पोस्ट सोनालीने केली आहे. सोबत एक फोटो देखील पोस्ट केला आहे. सोनाली कुलकर्णीने इन्स्टावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या हातात एक पुरस्कार म्हणजे सन्मान चिन्ह दिसत आहे. तिनं या फोटोला पोस्ट देत म्हटलं आहे की, चला….मोनिका निवडणुक हरली,पण ‘धुरळा’ साठी हा पुरस्कार देऊन गेली 🙏🏻…सोनालीला धुरळा सिनेमात साकारलेल्या मोनिकासाठी its.majja कडून पुरस्कार मिळाला आहे. यासाठी तिनं ही पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
समीर विद्वांस दिग्दर्शित धुरळा या सिनेमात अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ अशी मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त तगडी स्टारकास्ट दिसली होती. ग्रामीण भागातील राजकारणावर आधारित हा सिनेमा होता. मुलभूत गरजा पाणी, सुलभ शौचालय आणि शिक्षण यासाठी माणसाने झगडलं पाहिजे आणि ते मागून घेतलं पाहिजे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. वाचा- ‘पुन्हा येईन वाटत होतं पण..’; येऊ कशी नांदायला फेम मोहितची भावुक पोस्ट यंदाचे वर्ष सोनालीसाठी खास आहे. कारण लग्ननंतर आलेले तिचे पांडू आणि झिम्मा हे दोन सिनेमे यशस्वी झाले आहेत. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.