मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; NCBनं रियाविरोधात दाखल केलं 30 हजार पानी आरोपपत्र

सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; NCBनं रियाविरोधात दाखल केलं 30 हजार पानी आरोपपत्र

एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं आहे. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर CBI द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु होती. दरम्यान ड्रग्जचं प्रकरण समोर आलं. तेव्हापासून एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 5 मार्च: संपूर्ण देशात गाजलेलं सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरण अद्याप संपलेलं नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. सुशांत ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं न्यायालयासमोर 30 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. (NCB to file 30000 page charge sheet) एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं आहे. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर CBI द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु होती. दरम्यान ड्रग्जचं प्रकरण समोर आलं. तेव्हापासून एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत. शिवाय आता तर तब्बल 30 हजार पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं. त्यानंतर रियाला अटक करण्यात आली. तसंच एक महिना ती तुरूंगातही होती. रियाचं नावही आरोपपत्रात असून, 30 हजार पानांच्या या आरोपपत्रांमध्ये रियाच्या भावासह ३३ जणांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबी काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती. त्यांचीही नावं यात आहेत.

अवश्य पाहा - 'सुशांत गेला यात माझी काय चूक?', भडकलेल्या अंकिताचं VIDEO तून ट्रोलर्सना सणसणीत उत्तर

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. त्यानंतर एम्स रुग्णालयाकडून सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार सुशांतनं आत्महत्या केली होती. हा रिपोर्ट सीबीआयकडे देखील सोपवण्यात आला. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत.

First published:

Tags: Crime, NCB, Rhea chakraborty, Suicide, Sushant Singh Rajput