मुंबई, 29 डिसेंबर : अभिनेता सुनिल शेट्टीची लेक आथियानं हिरो सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर काही काळापूर्वीच रिलीज झालेल्या ‘मोतीचूर चकनाचूर’मध्ये ती नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली. हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत मात्र आथिया सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे क्रिकेटर के एल राहुलसोबत तिचं नाव जोडलं जाणं. मागच्या काही काळापासून या दोघांच्या रिलेशनशिपच्या जोरदार सुरू आहेत. आथिया किंवा राहुल यापैकी कोणीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोललेलं नाही पण त्यांनी याला नाकारलेलंही नाही. काही दिवसांपूर्वी एका पार्टीनंतरचे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता मात्र खुद्द राहुलनंच आथियासोबतचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केल्यानं हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर अथियाचे वडील अभिनेता सुनिल शेट्टीनंही कमेंट केली आहे. ‘सिंघम’-‘सिंबा’नंतर आता ‘सूर्यवंशी’ची एंट्री; पाहा धमाकेदार VIDEO
के एल राहुलनं आथियासोबतचा एका फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्यानं फोनचा रिसिव्हर कानाला लावलेला दिसत आहे. तर दुसरीकडे आथिया त्याच्या बाजूला उभी राहून हसत असल्याचंही दिसत आहे. राहुलनं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘हॅलो, देवीप्रसाद…?’ राहुलच्या या फोटोवर हार्दिक पांड्यानं इमोजीसोबत ‘क्यूटीज’ असं कमेंट केली आहे. तर सुनिल शेट्टीनं ‘लाफिंग इमोजी’ पोस्ट केले आहेत. राहुलनं या फोटोला जे कॅप्शन दिलं आहे हे सुनिल शेट्टीच्या ‘हेरा-फेरी’ मधील डायलॉग आहे.
अमिताभ बच्चन-अनुराग कश्यप यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, वाचा काय आहे कारण
आथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची ‘मोतीचूर चकनाचूर’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासबत नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका होती. तर सुनिल शेट्टी लवकरच रजनीकांत यांच्या ‘दरबार’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा मुंबईतील अंडरवर्ल्ड कल्चरवर आधरित असून रजनीकांत पोलिस कॉपची भूमिका साकारत आहेत. तर सुनिल शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. राहुल बद्दल बोलायचं तर आथिया अगोदर त्याचं नाव निधी अग्रवालसोबत जोडलं गेलं होतं.
VIDEO : काका-मामानंतर आता सलमान खानला व्हायचंय ‘बाबा’, स्वतःच केला खुलासा

)







