मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Jiah Khan Suicide Case: लेकीवर शारीरिक-मानसिक अत्याचार करत होता सूरज पंचोली, अभिनेत्रीच्या आईचा खुलासा

Jiah Khan Suicide Case: लेकीवर शारीरिक-मानसिक अत्याचार करत होता सूरज पंचोली, अभिनेत्रीच्या आईचा खुलासा

 'गजनी' फेम बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने आत्महत्या करत सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. अभिनेत्रीच्या या टोकाच्या निर्णयाने लोकांना धक्का बसला होता.

'गजनी' फेम बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने आत्महत्या करत सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. अभिनेत्रीच्या या टोकाच्या निर्णयाने लोकांना धक्का बसला होता.

'गजनी' फेम बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने आत्महत्या करत सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. अभिनेत्रीच्या या टोकाच्या निर्णयाने लोकांना धक्का बसला होता.

  मुंबई, 18 ऑगस्ट-   'गजनी' फेम बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने आत्महत्या करत सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. अभिनेत्रीच्या या टोकाच्या निर्णयाने लोकांना धक्का बसला होता. पण अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं होतं. जियाच्या आईने आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचं आपल्या जबाबात म्हटलं होतं. त्यांनी जियाचा बॉयफ्रेंड-अभिनेता सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. त्यांनतर आता पुन्हा एकदा या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. 3 जून 2013 मध्ये मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करणारी बॉलिवूड अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांनी बुधवारी विशेष न्यायालयात सांगितलं की, अभिनेता सूरज पांचोली त्यांच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे. सूरज पांचोली आणि जिया खान (2013 मध्ये) यांचंअफेअर होतं. आणि याचदरम्यान अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. सूरज पांचोली सध्या जामिनावर बाहेर आहे. जिया खानची आई राबिया खान यांनी बुधवारी विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांच्यासमोर या प्रकरणात त्यांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी कोर्टाला जियाचं बॉलिवूड पदार्पण, तिची कारकीर्द, करिअरदरम्यान आलेले चढ-उतार आणि सूरज पांचोलीसोबतचं नातं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, सूरज पांचोलीने जिया खानशी सोशल मीडिया साइटद्वारे संपर्क साधला होता. इतकंच नव्हे तर त्याने तिला भेटण्यासाठी दबावसुद्धा आणला होता. त्यांनी पुढं म्हटलं सुरुवातीला जियाच्या मनात याबाबत शंका होती. ती यासाठी इच्छुक नव्हती. परंतु नंतर ते सप्टेंबर 2012 मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते'. (हे वाचा:'या' मुलीला डेट करतोय करण मेहरा? निशाचा रुमर्ड बॉयफ्रेंड रोहित सेठियाचा मोठा दावा ) जियाच्या आईनं साक्ष देत पुढं सांगितलं, या भेटीनंतर जियाने मला काही फोटोसुद्धा पाठवले होते. मला वाटलं या दोघांमध्ये काहीतरी सुरु झालं आहे. परंतु तेव्हा तिने आम्ही फक्त एक चांगले मित्र असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्यांनतर सूरजने पूर्णपणे तिच्या दैनंदिन जीवनाचा ताबा घेतल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. राबियांच्या मते, ऑक्टोबर 2012 मध्ये दोघे एकमेकांच्या घरीसुद्धा राहू लागले होते. त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये जिया जेव्हा आपल्या लंडनच्या घरी आली होती, तेव्हा ती प्रचंड आनंदी असल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे. (हे वाचा:Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: युजवेंद्र चहल-धनश्री वर्माच्या नात्यात दुरावा? क्रिकेटरच्या पत्नीने इन्स्टावरुन हटवलं आडनाव ) परंतु त्यांनतर सूरज पांचोलीने जियाला एक मेसेज पाठ्वल्याचंही त्यांनी म्हटलंय, एका मित्रासोबत भांडण झाल्याने सूरज तिच्यावर नाराज होता. आणि त्याने माफी मागत त्याला आणखी एक संधी देण्याची मागणी त्याने या मॅसेजमधून केल्याचं राबिया यांनी सांगितलंय. तेव्हा मला समजलं की या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. परंतु जियाने त्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते गोव्याला गेले होते. परंतु त्याठिकाणी जियाला अस्वस्थ वाटत होतं असं जियाने सांगितल्याचं आईचं म्हणणं आहे. परंतु गोव्यातही त्याने मित्रांसमोर जियाचा अपमान केल्याचा आणि इतर मुलींसोबत फ्लर्ट केल्याचं राबिया यांनी म्हटलंय. राबिया खानच्या म्हणण्यानुसार, जियानं त्यांना सांगितलं होतं की,सूरज पांचोली तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा आणि तिला बेकार नावांनी हाक मारायचा'.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या