मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'या' मुलीला डेट करतोय करण मेहरा? निशाचा रुमर्ड बॉयफ्रेंड रोहित सेठियाचा मोठा दावा

'या' मुलीला डेट करतोय करण मेहरा? निशाचा रुमर्ड बॉयफ्रेंड रोहित सेठियाचा मोठा दावा

 प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा रावल यांचा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. हे सेलिब्रेटी कपल गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा रावल यांचा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. हे सेलिब्रेटी कपल गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा रावल यांचा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. हे सेलिब्रेटी कपल गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 ऑगस्ट-  प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा रावल यांचा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. हे सेलिब्रेटी कपल गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे. निशानं करण आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार केली होती. त्यांनतर करण मेहराने हे सर्व आरोप फेटाळून लावत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आरोपांची ही मालिका अजूनही थांबताना दिसून येत नाहीय. पुन्हा एकदा या प्रकरणातील नवी अपडेट समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी करण मेहराने एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये करणने आपली व्यक्तिगत बाजू मांडत निशाबाबत धक्कादायक खुलासे केले होते. यावेळी बोलताना करणने म्हटलं होतं, 'निशाने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. उलट निशा स्वतः विवाहबाह्य संबंधात आहे. इतकंच नव्हे तर निशा आपला भाऊ रोहित सेठियासोबत रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं सांगत करणने खळबळ माजवली होती. वास्तविक रोहित सेठिया हा निशाचा मानलेला भाऊ आहे. गेल्या 12-13 वर्षांपासून निशा त्याला राखी बांधत आहे. करण मेहराच्या या खुलास्यानंतर सर्वच चकित झाले होते.

दरम्यान आता रोहित सेठियाने करण मेहराच्या या आरोपांवर आता प्रत्युत्तर दिलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने करण मेहराचे आरोप फेटाळून लावत करणवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्याने मुलीचं नावही उघड केलं आहे. दोन्हीकडून वारंवार होत असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे लोक संभ्रमात आले आहेत. काय खरं आणि काय खोटं? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

(हे वाचा: दोन बायका अन् अनुराग कश्यपचं ऐका, फोटोसह कॅप्शनमुळे रंगली चर्चा)

तत्पूर्वी करणबाबत बोलताना रोहितने म्हटलं, ''करणने माझी इमेज खराब केली आहे. मी वकिलांच्या संपर्कात आहे आणि लवकरच मी सर्व सत्य समोर आणणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, रोहितने करण मेहराबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. रोहितने सांगितले की, करणच्या आयुष्यात 'एमएम' नावाची मुलगी आहे. तो म्हणाला की मी त्या मुलीचं पूर्ण नाव उघड करणार नाही. परंतु निशा आणि करणच्या विभक्त होण्यामागे 'MM' नावाची मुलगीच कारण असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच आपला निशासोबत कोणताही अनैतिक संबंध नाही. असं असत तर माझ्या पत्नी-मुलांनी मला घरात येऊ दिलं असतं का? असा सवाल त्याने केला आहे. रोहित हा मूळचा लखनऊचा आहे. सध्या तो मुंबईत राहात आहे.

First published:

Tags: Entertainment, Tv actors