जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 25व्या वर्षीच मृत्यू,अभिनेता-बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; Jiah Khan प्रकरणाची सीबीआय कोर्टात सुनावणी सुरु

25व्या वर्षीच मृत्यू,अभिनेता-बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; Jiah Khan प्रकरणाची सीबीआय कोर्टात सुनावणी सुरु

जिया खान-सुरज पांचोली

जिया खान-सुरज पांचोली

Jiah Khan Death Case: ‘गजनी’ फेम बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकरणात अभिनेता सुरज पांचोलीला अटक करण्यात आली होती.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,2 मार्च- ‘गजनी’ फेम बॉलिवूड अभिनेत्री जिया खान च्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकरणात अभिनेता सुरज पांचोली ला अटक करण्यात आली होती. दरम्यान जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला होता. आता सुरज पांचोलीने या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी सीबीआयकडे मागणी केली होती. या प्रकणावर आता सीबीआय कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. अभिनेता सुरज पांचोली कोर्टात दाखल झाला आहे. अभिनेत्रीची आत्महत्या की हत्या? याचा उलगडा अद्याप झालेला नाहीय. या सीबीआय सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अभिनेत्री जिया खानचं निधन झालं तेव्हा ती अवघ्या 25 वर्षांची होती. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने म्हटले होते की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. जियाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला आरोपी म्हणून अटक करण्यात आलं होतं. 10 जून 2013 रोजी सूरजला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला. सूरजवर अजूनही कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत खटला सुरू आहे. जियाच्या आईचे सुरजवर गंभीर आरोप- मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करणारी बॉलिवूड अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांनी विशेष न्यायालयात सांगितलं की, अभिनेता सूरज पांचोली त्यांच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे. सूरज पांचोली आणि जिया खान (2013 मध्ये) यांचं अफेअर होतं. आणि याचदरम्यान अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. सूरज पांचोली सध्या जामिनावर बाहेर आहे. जियाच्या आईने जिया आणि सुरज यांच्या नात्याबाबत सांगताना म्हटलं होतं की, सूरज पांचोलीने जिया खानशी सोशल मीडिया साइटद्वारे संपर्क साधला होता. इतकंच नव्हे तर त्याने तिला भेटण्यासाठी दबावसुद्धा आणला होता. त्यांनी पुढं म्हटलं सुरुवातीला जियाच्या मनात याबाबत शंका होती. ती यासाठी इच्छुक नव्हती. परंतु नंतर ते सप्टेंबर 2012 मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. आणि त्यांनतर ते रिलेशनशिपमध्ये आले होते’.

News18लोकमत
News18लोकमत

सुरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. सूरजने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत झळकला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात