मुंबई, 29 सप्टेंबर : ‘झलक दिखला जा 10’ शो सध्या मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. या शोमधील अनेक डान्स व्हिडीओ चर्चेचा विषय ठरताना पहायला मिळत आहे. अशातच या कार्यक्रमातील लोकप्रिय जज नोरा फतेहीचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओनं इंटरनेटचं वातावरण आणखीनच गरम केलंय. त्यामुळे सोशल मीडियावर नोराच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. कलर्स मराठीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये धकधक गर्ल माधुरी दिक्षित म्हणते की मला नोराला लावणी करताना पहायचं आहे. त्यानंतर नोरा स्टेजवर ‘आता वाजले की बारा’ या गाण्यावर लावणी डान्स करते. तिच्यासोबत अमृता खानविलकरही स्टेजवर थिरकताना दिसत आहे. नोरा फतेहीचा हा परफॉर्मन्स इतका धमाकेदार झाला की माधुरीही स्वतःला शिट्टी वाजवण्यापासून रोखू शकली नाही.
नोरानं केलेला नववारी साडीतील लुकही चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तिच्या या लुकवर आणि डान्स परफॉर्मन्सवर खूप साऱ्या कमेंट येत आहेत. नोरावर कौतुकांचा वर्षाव होतोय. त्यामुळे हा नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडिवर जोरदार चर्चेत असलेला पहायला मिळत आहे.
दरम्यान, सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. या शोचा हा दहावा सीझन आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक लोकप्रिय कलाकारांनी या शोमध्ये सहभाग नोंदवला आहे. ‘झलक दिखला जा’च्या या सीझनला करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही जज करत आहेत. तसेच मनीष पॉल हा शो होस्ट करत आहे.