मुंबई, 5 नोव्हेंबर- बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan case) एका ड्रग्स पार्टी प्रकरणामुळे अनेक दिवसांपासून तुरुंगवसात होता. 30 ऑक्टोबरला आर्यनची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र या प्रकरणामुळे शाहरूख खान मागच्या काही दिवसापासून चर्चे विषय ठरला आहे. अशा स्थितीमध्ये शाहरूखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील (jayant patil ) यांनी चारचौघात झापल्याचं दिसत आहे.
नोव्हेंबर 2017 चा हा व्हिडीओ आहे. शाहरुख आपल्या अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परत येत होता. अलिबागहून जेव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे ऑफ इंडिया इथं आला. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी गेट वेवरच मोठी गर्दी केली होती. याचवेळी आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेने जात होती. मात्र, शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी चाहत्यांसमोरच शाहरुखला चांगल झापलं. हाच व्हिडीओ आता पुन्हा सोशल मीडीवर व्हायरल होत आहे.
#WATCH: Jayant Patil, Maharashtra MLC from Alibaug, heckled Shah Rukh Khan for not coming out of his yacht at Alibaug Jetty (Mobile video) pic.twitter.com/lq5owiKZnw
— ANI (@ANI) November 11, 2017
यावेळी जयंत पाटील शाहरूख खानला सुनावत म्हटले होती की,‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तू खरेदी केलं काय?, माझ्या परवानगीशिवाय तू अलिबागला येऊ शकत नाही . यानंतर जयंत पाटील आपल्या बोटीने पुढे गेले.
वाचा :'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ
शाहरुख मात्र शांतपणे बोटीतून बसून राहिला व नंतर बाहेर पडला आणि निघून जातो. शाहरुख बाहेर येताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. शाहरुख यावेळी जयंत पाटील यांना काहीच उत्तर न देता निघून गेला. मात्र, हा संपूर्ण प्रकार तेथील एका चाहत्यानं कॅमेरात कैद केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Sharukh khan