जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी काय बहिरी नाही' जया बच्चन यांचा पुन्हा पारा चढला, पापाराझींवर जोरात ओरडल्या

'मी काय बहिरी नाही' जया बच्चन यांचा पुन्हा पारा चढला, पापाराझींवर जोरात ओरडल्या

मी काय बहिरी नाही..' जया बच्चन यांचा पुन्हा पारा चढला, पापाराझींवर जोरात ओरडल्या

मी काय बहिरी नाही..' जया बच्चन यांचा पुन्हा पारा चढला, पापाराझींवर जोरात ओरडल्या

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा कधी पारा चढेल याबद्दल काहीच सांगता येत नाही. अनेकदा त्या गर्दीच्या ठिकाणी पापारझीवर ओरडताना दिसतात. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा कधी पारा चढेल याबद्दल काहीच सांगता येत नाही. अनेकदा त्या गर्दीच्या ठिकाणी पापारझीवर ओरडताना दिसतात. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकत्याच जया बच्चन या मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासोबत त्यांच्या आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या स्क्रीनिंगला आल्या होत्या. यावेळी देखील त्यांचा पारा चढलेला दिसला. पॅप्सने जयाडी असं नाव घेताच, जया बच्चना यांचा पारा शंभरीत पोहचला. जया बच्चन यांचा राग केवळ बच्चन कुटुंबीयच नाही तर बॉलीवूड रसिकांनाही चांगलाच कळला आहे. त्यांना राग येतो, अनेकदा त्या मिडियावर भडकताना दिसतात. सध्या त्या पापाराझींवर अशा काही ओरडल्या, जे पाहून अनेकांना वाईट वाटत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाचा- 15 दिवसांआधी उडाल्या होत्या निधनाच्या अफवा; अखेर आज प्रसिद्ध गायकाचा मृत्यू खरं तर, जया त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता यांच्यासोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या स्क्रीनिंगसाठी जबरदस्त एथनिक ड्रेसमध्ये पोहोचल्या होत्या, ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या. कार्यक्रमस्थळी पोहोचताच त्या श्वेता आणि अभिषेकसोबत जाण्यासाठी थोडा वेळ थांबल्या, पण त्याचवेळी फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी ओरडायला सुरूवात केली. त्यांचा सततचा आवाज ऐकून जया रागावल्या आणि त्यांना गप्प केले आणि त्या रागानेच म्हणाल्या , ‘मी काय बहिरी नाही. ओरडू नका, शांतपणे बोला.

News18लोकमत
News18लोकमत

यानंतर मात्र या तिघांनी कुठेही फोटोला पोझ न देता, तिथे न थांबता तिघेही पुढे निघाले. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही जण त्यांना शाळेच्या प्रिन्सिपल म्हणत आहेत, तर अनेकजण जया यांना पॅप्सबद्दल कसलचं प्रेम नसल्याचे सांगत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, त्यामुळेच आम्ही रेखावर प्रेम करतो, तिच्यात ना अहंकार आहे ना कुठला अॅटीट्यूड.

जाहिरात

जया बच्चन यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या सगळीकडं चर्चा आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, शबाना आझमी आणि धर्मेंद्र देखील दिसणार आहेत. करण जोहरचा हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात