मुंबई, 1 मार्च : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात (Defamation Case) हजर न राहिल्याने मुंबईच्या न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विरोधात वॉरंट जारी केला आहे. समन्स बजावूनही कंगना रणौत कोर्टात हजर न राहिल्याने हा वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर मुंबईच्या एका कोर्टाने अभिनेत्री कंगना रणौत यांना समन्स बजावला होता. तत्पूर्वी जावेद अख्तर मानहानी प्रकरणाचा तपास करणं आवश्यक असल्याचं मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितलं होतं. डिसेंबर 2020 मध्ये, अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने जुहू पोलिसांना मानहानीच्या तक्रारीचा तपास करण्याचे निर्देशही दिले होते. पण समन्स बजावूनही कंगना चौकशीसाठी हजर राहिली नाही. याउलट तिने संबंधित समन्सच्या बातमीच्या ट्वीटला क्वोट करत आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. ‘सर्व गिधाडांच्या झुंडीसमोर एकटी वाघीन आहे, मजा येईल’ अशा आशयाचं ट्वीट कंगनाने केलं होतं.
Geedaron ka ek jhund aur ek sherni .... mazaa aayega 🙂 https://t.co/xzsL7eQlYu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 1, 2021
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, कंगना रणौत विरोधात फिर्यादी (अख्तर) यांनी केलेल्या आरोपांचा पुढील तपास केला जात आहे. न्यायालयाने या प्रकरणात सुनावणीची पुढील तारीख 1 मार्च निश्चित केली आहे. अख्तर यांचे वकील जय कुमार भारद्वाज यांनी सोमवारी कोर्टाला सांगितलं की, गेल्या महिन्यात पोलिसांनी कंगना रणौत यांना समन्स बजावला होता. जाब नोंदवून घेण्यासाठी पोलिसांसमोर हजर रहावं, असं समन्समध्ये सांगण्यात आलं होतं. हे ही वाचा - VIDEO : रिया चक्रवर्तीची पुरुषप्रधान मानसिकतेला पुन्हा चपराक परंतू यासंदर्भात अभिनेत्रीने अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर एका मुलाखतीत कंगनाने त्यांच्याविरोधात मानहानीकारक टिप्पण्या केल्या होत्या, असा आरोप जावेद अख्तरने आपल्या तक्रारीत केला आहे. कंगनाने केलेली सर्व विधानं निराधार असून यामुळे आपल्या प्रतिष्ठेचं हनन झाल्याचा दावा अख्तर यांनी केला आहे.