Mee Too नंतर पुन्हा हादरलं Bollywood! अभिनेत्री बनवण्याचं आमिष दाखवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Mee Too नंतर पुन्हा हादरलं Bollywood! अभिनेत्री बनवण्याचं आमिष दाखवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांनी सापळा रचून बॉलिवूडमधील सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी : बॉलिवूडमधील (Bollywood) Mee Too नंतर आता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अभिनेत्री किंवा मॉडेल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं जातं होतं. हे रॅकेट पोलिसांनी सापळा रचून उद्ध्वस्त केलं आहे. Mee Too नंतर Bollywood पुन्हा हादरलं आहे.

प्रेम नावाच्या एका व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. प्रेम हा फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करतो. अभिनेत्री आणि मॉडेल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींना चांगली भूमिका देण्याचं आमिष दाखवून जबरदस्ती वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होता.  जाहिरात, वेब सीरिज आणि फिल्ममध्ये काम करणाऱ्या तरुणींना तो टार्गेट करत होता.

रॅकेटबाबत माहिती होताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पडलं आहे. बुधवारी मुंबई क्राइम ब्रांचनं (Mumbai crime branch) ही कारवाई केली आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रेमसह दोन महिलांचा यात समावेश आहे. त्यांनी इतर 8 महिलांनादेखील यासाठी प्रवृत्त केलं. या महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.

हे वाचा - सैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत! हा आहे आरोप

टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार Indian Penal Code (IPC) सह  Prevention of Immoral Traffic Act (PITA)  अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 5.5 लाखांची रक्कम, 15 फोन आणि एक कारही जप्त करण्यात आली आहे.

दिग्दर्शक साजिद खानही पुन्हा चर्चेत

दरम्यान लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानही पुन्हा चर्चेत आला आहे.  दिवंगत अभिनेत्री जिया खानची (Jiah Khan) बहिण करिश्मा खानने साजिदवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. करिश्मा खान म्हणाली की, एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान साजिद खानने जियाचा विनयभंग केला होता. एवढंच नाही तर, साजिदने एकदा माझ्यासोबतही असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी जियाने मला साजिदपासून वाचवलं होतं, असा आरोपही करिश्मा खानने केला आहे.

हे वाचा - Tandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक? UP पोलीस मुंबईत दाखल

त्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानेही साजिद खानविषयी खळबळजनक खुलासा केला आहे. "एप्रिल 2005 मध्ये माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी जेव्हा मी साजिदला भेटले. तेव्हा त्यानं त्याच्या पँटमधून प्रायवेट पार्ट काढून मला पकडण्यास सांगितलं. तसेच त्याचा अनुभव घ्यायलाही सांगितलं. त्यावेळी मी त्याला सांगितलं की, मला माहित आहे की पुरुषाचं प्रायवेट पार्ट काय असतो. त्यामुळे तुझ्या या भेटीमागचा माझा उद्देश प्रायवेट पार्ट पकडणं नाही", अशा आशयाचं ट्वीट करत शर्लिनने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.

Published by: Priya Lad
First published: January 20, 2021, 8:54 PM IST

ताज्या बातम्या